आयटीआय
आयटीआय
नाशिक

आयटीआय प्रवेश २१ ऑगस्टपर्यंत

निशुल्क मार्गदर्शन सत्रांचे आयाेजन

Bharat Pagare

नाशिक | Nashik

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्वत्र असलेल्या खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून, सुधारित वेळापत्रक आयटीआयने जाहीर केले आहे. या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तसेच माेबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश अर्जातील माहिती बदलणे व हरकती नोंदविता येणार आहे.

प्रवेशाची पहिली फेरी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.

तिसऱ्या फेरीसाठी १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. १८ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता निवडयादी संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. चौथ्या फेरीसाठी १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्राधान्य भरता येतील. या प्रवेशाची यादी २८ सप्टेंबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांना २९ ते ३ ऑक्‍टोबर या कालावधीत प्रवेश निश्‍चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासाठी ५ ऑक्‍टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येईल.

चाैकट१

सर्व ऑनलाईन

उमेदवारांनी नोंदणीकरिता संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरून आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा. लॉग इन होऊन ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी व भरलेली माहिती तपासून पहावी व त्यानंतरच ऑनलाईन पेमेंट करावे. एकदा पेमेंट केल्यानंतर अर्जामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. नाशिक विभागाकरिता 7385165239 व 7385345238 हे हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला असून, (सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) यावर संपर्क साधता येईल.

चाैकट२

मार्गदर्शन सत्र सुरू

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी संस्थांमध्ये दिनांक १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२० दरम्यान रोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्रआयोजित करण्यात येत आहे. या सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. सर्व सुटीच्या दिवशी देखील मार्गदर्शन सत्र प्रवेश प्रक्रिया संबंधी कार्यवाही सुरू राहील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com