दहावीच्या गुणांवर होणार आयटीआय प्रवेश प्रक्रिया

दहावीच्या गुणांवर होणार आयटीआय प्रवेश प्रक्रिया
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (महिला) संस्था

Nashik

राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (Government and private industrial training institutes) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत (Craftsman Training Scheme) प्रवेश सत्र (Admissons) २०२१ साठीचे प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या (10th Class Marks) आधारे केंद्रीय ऑनलान प्रवेश प्रणालीतून (Online access system) करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (Directorate of Vocational Education and Training) परिपत्रकात दिली.

शिवाय प्रवेश अर्जासाठी (Admission application) विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची सुविधा ऑनलाइन स्वरूपात (Online Format) उपलब्ध करून दिली आहे. प्रमाणपत्रे तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थेत (ITI Organization) प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज (Admission Online Application) करण्याचे आवाहनही केले आहे.


सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती लवकरच संकेत स्थळावर (Online Website) देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in वर या संकेतस्थळावर संपर्क साधावा . तसेच प्रवेशाचे लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

कोविडमुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर (Result Declare) करण्याचा निर्णय सर्वच मंडळांनी घेतला आहे. बहुतांश विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातील असल्याने सामाईक प्रवेश प्रवेशाचा पर्याय न ठेवता दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमानुसार सर्वाधिक गुणाधिक्याच्या आधारावर सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मोबाईल ॲप्लिकेशन
प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी MahalTi App नावाचें Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करून घ्यावे. सदर App द्वारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करू शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करू शकतात. अधिकाधिक उमेदवारांनी ' सदर सुविधेचा लाभ घ्यावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com