सरकारी नोकरदारांनीच सहकारी पतसंस्थाची स्थापना केली: हरिभाऊ वाकचौरे

जि.प.कर्मचारी पतसंस्था पदाधिकारी सन्मान सोहळा व परिषद
सरकारी नोकरदारांनीच सहकारी पतसंस्थाची स्थापना केली: हरिभाऊ वाकचौरे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात (maharashtra) नव्हे तर जगात प्रथम सरकारी नोकरांनीच सहकाराच्या माध्यमातून सरकारी पतसंस्थेची (Government credit institutions) स्थापना केल्याचा इतिहास आहे. सरकारी नोकरांच्या पतसंस्थेत वसुलीसाठी (recovery) सहकार कायदयात तरतुद (Provisions in the Co-operative Act) असल्यामुळे या संस्थाना भविष्यकाळ उज्जल आहे.

सार्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावेत तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी (Government employees) यांना बचतीसाठी नविन योजना आखाव्यात. कर्जवाटप सूक्ष्म व कायदेशीर (Subtle and legal) करावे. त्याचप्रमाणे सर्व तळागाळातील वेगवेगळ्या विभागात ग्रामीण भागात (rural area) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सभासदत्व देऊन न्याय द्यावा, नाहीतर शहरातला कर्मचारी तुपाशी आणि ग्रामीण भागातला उपाशी हे होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्‍य सहकारी संघाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ वाकचौरे (Former Chief Executive Officer of Maharashtra State Cooperative Union Haribhau Vakchoure) यांनी केले.

दिंडोरी (dindori) रोडवरील अभिषेक प्‍लाझा येथील सभागृहात रविवारी (दि.२०) झालेल्या या परिषदेत सहकार विषयक अनेक बाबींवर चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राहूल रनाळकर होते. नाशिक जिल्‍हा परीषद (zilha parishad nashik), जिल्‍हा रुग्‍णालय (District Hospital), जिल्‍हा न्‍यायालयीन (District Court), औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (Industrial Training Institute), जिल्‍हा पशुसंवर्धन, जिल्‍हा हिवताप, जिल्‍हा आदिवासी विकास विभाग, जिल्‍हा ग्रामसेवक, इगतपुरी तालुका (igatpuri taluka) पतसंस्‍था या सहकारी पतसंस्‍थांवरील विजयी संचालकांना यावेळी सन्‍मानित करण्यात आले.

प्रास्‍ताविकात जिल्‍हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे उत्तमराव गांगुर्डे यांनी सक्षम सहकार चळवळ उभी करण्यासाठी प्रत्‍येकाने योगदान देण्याची आवश्‍यकता आहे,असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे म्‍हणाले, सहकारी संस्‍थांवर युवा नेतृत्‍वाला संधी देण्याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी विविध उपक्रम, कामकाजात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. सहकार क्षेत्राचे महत्‍व अधोरेखीत करण्यासाठी सहकार परीषद होत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

याप्रसंगी राज्‍य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय सचिव दिलीप थेटे, जिल्‍हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे उपाध्यक्ष रविंद्र थेटे, न्‍यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष दादाभाऊ निकम, जिल्‍हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष विलासराव शिंदे, पशुवैद्यकीय व्‍यवसायिक कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष भगवान पाटील,

जिल्‍हा परीषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, उपाध्यक्ष किरण निकम, मार्गदर्शक रविंद्र आंधळे, शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्‍क परिषदेचे जिल्‍हाध्यक्ष नीलेश देशमुख, दिलीप सलदे, मंदाकिनी पवार-निकम, संदीप पाटील,जी. पी.खैरनार,भाऊडू हिरे,बिट्टू पवार,सचिन विंचूरकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com