सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया निधी दिला नाही ही बाब दुर्दैवी: भुजबळ

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया निधी दिला नाही ही बाब दुर्दैवी: भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याने (Simhastha Kumbh Mela) नाशिकला आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. या विश्वस्तरीय सोहळ्याची तयारी मागील अनुभवानुसार किमान तीन-चार वर्षे अगोदर पासूनच होणे अपेक्षित आहे.

मात्र अद्याप तशी तयारी सुरू झाली नाही. २०२६-२७ ला हा सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) पार पडणार आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याचा साधा उल्लेख देखील अर्थसंकल्पात नाही अशी खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी विधान सभेत व्यक्त केली. यावेळी भुजबळ म्हणाले कि, ज्या त्रंबकेश्वर (Trambakeshwar) मध्ये हा कुंभमेळा होणार आहे तिथे प्लॉटींगचा धंदा सध्या जोरात सुरू आहे.

अतिक्रमण (Encroachment) करून बांधकाम करण्याचे पेव या भागात फुटले आहे. साधुग्रामसाठी देखील जागा उरली नाही. नाशिकमधील साधुग्रामच्या जागेसाठी ३७५ एकर जागा भूसंपादन (Land acquisition) करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र याबाबत अद्याप उत्तर आले नाही तब्बल सव्वाचार हजार कोटींचा हा प्रस्ताव आहे.

नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीत २५० एकर जागेवर साधुग्राम आरक्षण आहे. २००३-०४ पासून मनपा ने ह्या जागा आरक्षित करून ठेवल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांना (farmers) त्यात काहीही करता येत नाही. २०१४-१५ च्या कुंभमेळाव्याच्या वेळी तात्पुरत्या भाडेतत्वावर त्या जागा भाडयाने घेऊन साधुग्राम करून वेळ भागवली. तेव्हा शेतकरी न्यायालयात गेले व ८ महिने विलंब झाला.

शेवटी तडजोडीने शेतकऱ्यांनी जागा दिली. साधुग्राम झाल्याने तेथे रस्ते, सिमेंट, दगड, वाळू, मुरूम टाकल्याने त्या जमिनी नापीक झाल्या व तेथे शेती करणे शक्य नाही. आता त्या जागा कायमस्वरूपी ताब्यात घ्याव्याच लागतील. परंतु त्यांना इतके पैसे कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच भुजबळ यांनी नाशिकच्या प्रदुषणासोबत वाहतुकीची कोंडी (traffic jam) सोडविण्यासाठी शाश्वत उपाययोजना करा,

शहरातील अतिक्रमण (Encroachment) आणि बेकायदेशीर बांधकामे रोखा, नाशिकला निओ मेट्रो (Neo Metro) नव्हे तर इतर शहरात राबविण्यात आलेल्या मेट्रोची गरज, नाशिक शहरातील भविष्याचा वाढता विस्तार लक्षात घेता किकवी प्रकल्प मार्गी लावावा, नाशिक, पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला (High Speed ​​Rail Project) गती द्या, जिल्हा बँकेच्या कारभारात व्हावी सुधारणा आदी विविध विषय सभागृहात मांडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com