सप्तशृंगी मंदिर गाभार्‍यात भाविकांना धक्काबुक्की

सप्तशृंगी मंदिर गाभार्‍यात भाविकांना धक्काबुक्की

अभोणा । वार्ताहर Abhona

दिवाळी सुट्टीची पर्वणी साधत भाविकांनी गर्दी केल्याने सप्तशृंगी गडाला ( Saptshrungi Gad )यात्रेचे स्वरूप आले आहे. भाविकांना देवीचे दर्शन न घेताच गाभार्‍यात महिला पुरुषांसह येथील सुरक्षारक्षकांकडून ,सेवेकरी यांच्याकडून धक्के देऊन बाहेर काढून देत असल्याचे आरोप भाविकांकडून केले जात आहे.

महिला पुरुष वयोवृद्ध लहान मुले मुली कुटुंबांसाठी कुठलीच वेगळी रांग नसल्याने एकाच रांगेत सर्वांना दर्शनासाठी सोडत असल्याने वयोवृद्ध महिला व लहान बालगोपाळांचे चांगले हाल होता आहे. ट्रस्ट फक्त बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत असल्याने मंदिरात योग्य ते नियोजन करणे गरजेचे असल्याचे भाविकांमध्ये बोलले जात आहे. गर्दीत फायदा घेत चोरांनी आपला डाव साधला अनेक भाविकांचे महागडे मोबाईल व पाकिटे सोन्याची चैन. मंगळसूत्र चोरीला गेले.

दवसेंदिवस गर्दी होत आहे. पण देवी ट्रस्ट याबाबत सुलभ दर्शन होण्यासाठी रोपवेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. पण पायरीने सर्वसामान्य भाविक मंदिर जात असतो. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहावे लागते. देवी विश्वस्त मंडळाने करीत नियोगजन करावे, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष प्रकाश कडवे यांनी केली आहे.

देवीच्या गाभार्‍यातील कर्मचारी दर्शन न करू देता हाताला धरून ढकलुन दिले जात आहे. नियोजन नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चेतन आहिरे, भाविक कल्याण

दिवसें दिवस मंदिरात गर्दी होत आहे पण देवी ट्रस्ट याबाबत सुलभ दर्शन होण्यासाठी रोप वे साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे पण पायरीने सर्वसामान्य भाविक मंदिर जात असतो त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहावे लागते यासाठी देवी संस्थानने भाविकाना सुविधा पुरविणे गरजेचे असताना फक्त बघण्याची भुमिका देवी संस्थान व विश्वस्त मंडळ करीत आहे

( प्रकाश कडवे ,शहर अध्यक्ष भाजपा, सप्तशृंगी गड )

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com