अपघाती वळणाचा प्रश्न ऐरणीवर

अपघाती वळणाचा प्रश्न ऐरणीवर

नांदूरशिंगोटेः अपघातात दोन जण गंभीर; गतिरोधकाची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर Nashik- Pune Highway नांदूरशिंगोटे Nandurshingote परिसरात हॉटेल साई सोनाई Hotel Sai Sonai समोर असलेल्या वळणावर चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या अपघाती वळणाचा Accidental Turn on road व गतिरोधकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा महामार्ग व्यवस्थापनाला ग्रामपंचायतकडून निवेदन देऊनही या वळणावर गतिरोधक टाकण्याची कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत.

पुणेकडून नाशिककडे येणारी तवेरा क्र. एम. एच. 12/ एम. आर. 9154 ही नांदुरशिंगोटे परिसरात आली असता गावातून संगमनेरला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघालेले दोन युवक या धोकादायक वळणावरुन रस्ता पार करत होते. मात्र, चारचाकी चालकास वळणामुळे ही दुचाकी न दिल्याने चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन युवक लांब फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले. धडकेने दुचाकीचा चक्काचूर झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत रुग्णवाहिकेला पाचारण केले व त्या युवकांना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

हॉटेल साई सोनाई समोरच्या या वळणावर बायपास सुरू होत असून गावात जाण्यासाठीही या ठिकाणाहूनच रस्ता फुटतो. या ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. यामध्ये अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. या वळणावर कुठल्याही गती रोधक नसल्याने रस्ता पार करताना काळजात धडकी भरत असते. वाहनचालकांनाही याचा अंदाज येत नसल्याने तेही भरधाव वेगाने येथून जात असतात.

नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत व परिसरातील शेतकर्‍यांनी अनेक वेळा नाशिक-पुणे महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना पत्र देऊन येथे गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे. तात्काळ गतीरोधक न बसवल्यास परिसरातील शेतकरी व हॉटेल व्यावसायिकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अन्यथा रास्ता रोको

सदर वळण हे अत्यंत धोकादायक असून रस्ता ओलांडताना समोरुन येणारे वाहन दिसत नाही. समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने याठिकाणी नेहमीच अपघातांच्या घटना घडतात. त्यात गतिरोधक नसल्याने वाहनेही धरधाव वेगाने येथून जातात. महामार्ग व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नाही. तत्काळ गतिरोधक न झाल्यास रास्ता रोको करणार आहे.

किशोर शेळके, नागरिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com