पाथरे बुद्रुक येथे विलगीकरण केंद्र सुरू

पाथरे बुद्रुक येथे विलगीकरण केंद्र सुरू

सिन्नर | Sinnar

पाथरे बुद्रुक येथील प्राथमिक शाळा चिने वस्ती मध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे.

या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. येथे रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहे. गावापासून काही अंतरावर असणाऱ्या या कक्षात आजारी व्यक्ती तसेच कोरोना व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्वतंत्र खोली नाही तसेच शौचालयाची सुविधा नसेल अशा कुटुंबातील व्यक्तींना विलगिकरनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

कोरोना रुग्ण रोज वाढत असल्याने या वस्ती शाळेत संबंधित व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. गावाच्या हितासाठी तसेच आरोग्य सुरक्षिततेसाठी या विलगिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्तीने तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी संकोच न बाळगता तसेच न घाबरता आपल्या सुरक्षिततेसाठी अलिप्त राहणे हिताचे आहे. त्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

रुग्णसंख्या वाढल्यास वाढीव उपाययोजना करण्यात येणार आहे असे सरपंच सुजाता नरोडे यांनी सांगितले. या कक्षाचे उदघाटन वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेंडकुळे, सदस्य वाल्मिक माळी, ग्रामसेवक गोविंद मोरे, भाऊसाहेब नरोडे, चंद्रकांत चिने, सचिन नरोडे, दिवाकर मोकळ, रवींद्र चिने, राजेंद्र बिडवे, समाधान गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी नरोडे, आशा सेविका सेविका गायत्री नाईकवाडे, बिट हवालदार दशरथ मोरे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com