दरीत लोकसहभागातून २० बेडचा विलगीकरण कक्ष सुरु

कृउबा सभापती देविदास पिंगळे यांचे हस्ते उदघाटन
दरीत लोकसहभागातून २० बेडचा विलगीकरण कक्ष सुरु

नाशिक | Nashik

नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दरी मनोली, मुंगसरा भागासाठी गावांसाठी लोकसहभागातून व दरी ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नातून दरी गावातील कै आनंदराव पिंगळे सोसायटीच्या डॉ. बळीराम हिरे विद्यालयात करोना बाधित व्यक्तींसाठी २० बेडचा विलगीकरण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

या विलगीकरण कक्षाचे उदघाटन (दि.१५ मे) माजी खासदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांचे हातून फीत कापून करण्यात आले आहे.

दरी गावातील विद्यालयात दोन कक्षात हे विलगीकरण केंद्र सुरू राहणार आहे. या ठिकाणी विलगिकरण कक्षात राहणाऱ्या महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र्य सोयी करण्यात आल्या आहेत. याकामी गावातील आरोग्यसेवा देणारे डॉक्टर व कोरोना योद्धे आपली आरोग्य सेवा बजावणार आहे. त्यासाठी या ठिकाणी तपासणी सह, औषधोपचार ही केला जाणार आहे.

तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निसर्गरम्य वातावरणात गावातील विद्यालयातील महिला, पुरुषांसाठी हे विलगीकेंद्र अखंड आरोग्यसेवा देणार आहे, अशी माहिती येथील उपसरपंच अरुण दोंदे यांनी दिली आहे. या विलगीकरण कक्षासाठी अनेक दानदाते मदत करीत आहेत.

याकामी लागणाऱ्या अधिक औषधे साधन साहित्यासाठी दानदाते सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी साहाय्य करावे अशी मागणी ही स्थानिक ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे. याकामी सर्वोतोपरी साहाय्य करू असेही कृउबा चे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com