मुखेड ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

मुखेड ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी

मुखेड ग्रामपंचायतीला( Pimpalgaon Grampanchayat ) आयएसओ मानांकन (ISO Certification)प्राप्त झाले असल्याची माहिती ग्रा.पं. सरपंच अमोल जाधव यांनी दिली आहे.गांधीवादी नेते स्व.दुलाजी नाना पाटील यांच्या मुखेड गावाचा सरपंच अमोल जाधव यांच्या रुपाने कायापालट होत असून आज संपूर्ण गावात रस्ते काँक्रिटीकरण, गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात आले आहे.

ग्रामपालिकेची भव्य इमारत, सुसज्ज वाचनालय, सर्व साधन सामुग्रीने युक्त असलेली व्यायामशाळा, घंटागाडीचे नियोजन, कचरा व्यवस्थापन, सुलभ शौचालय सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, शाळेचे डिजिटलीकरण, तार कंपाउंड, बचतगटांना प्रशिक्षण, अवैध दारूबंदी, भूमिगत गटार व्यवस्था, वृक्ष लागवड, महिलांच्या आरोग्याची काळजी, आरोग्य तपासणी शिबिर आयोजन आदी सुखसोयींनी गावाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर सभागृहामध्ये हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवभारत ग्रुप मुंबईचे अध्यक्ष श्रीनिवास राव आणि मुंबई दैनिक नवराष्ट्रचे निवासी संपादक ब्रिज मोहन पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेडचे सरपंच अमोल जाधव व ग्रामपालिका सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीनुसार मुखेड ग्रामपंचायतीचे आयएसओ प्रमाणीकरण केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त आयक्यूसीपीएल संस्थेकडून करण्यात आले आहे. हा बहुमान मिळवणारी मुखेड ग्रामपंचायत महाराष्ट्रात व नाशिक विभागात दुसरी ठरली आहे. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासन मान्य एस 2 इन्फोटेक संस्थेची मदत घेण्यात आली आहे.

आयएसओ प्रमाणीकरण करण्यासाठी सरपंच अमोल जाधव व ग्रा.पं. सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे ग्रामसेवक कमलेश सावंत यांनी सांगितले. त्याप्रमाणे कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. त्यामुळे हा बहुमान मुखेडसारख्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला मिळविता आला. मुखेड ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अमोल जाधव व त्यांचे सहकारी सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com