ईश्वरी सावकारची बीसीसीआयच्या हाय परफॉर्मन्स कॅम्पसाठी निवड

ईश्वरी सावकारची बीसीसीआयच्या हाय परफॉर्मन्स कॅम्पसाठी निवड

नाशिक । Nashik

नाशिकच्या ईश्वरी सावकारची (ishwari savkar) मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (BCCI) आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या (NCA) राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे...

ईश्वरी सावकारची यापूर्वी मे व जूनमध्ये राजकोट (Rajkot) येथे झालेल्या शिबीरासाठी निवड झाली होती. या शिबिरातून बीसीसीआयने सहा संघ तयार केले होते. त्यांच्यात विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतक व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ५०९ धावा केल्या. याबरोबरच गेल्या हंगामातील विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची बीसीसीआयतर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉर्मन्स शिबिरासाठी निवड झाली आहे.

तसेच ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रतिनिधित्व करताना आंध्रप्रदेशविरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात (Senior Women's Cricket Team) देखील तिची निवड झाली होती.

तर गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर (Jaipur) येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीच्या (Challenger Trophy) स्पर्धेतही तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या जोरावर ईश्वरीची एप्रिल महिन्यात पदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती.

दरम्यान, या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे (Nashik District Cricket Association) चेअरमन विनोद शहा (Vinod Shah) सचिव समीर रकटे (Sameer Rakte) तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com