मंत्रालयात बैठक घेऊन सिंचन योजनांना गती देणार

जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही
मंत्रालयात बैठक घेऊन सिंचन योजनांना गती देणार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

‘ओतूर, श्रीभुवनसह कळवण (Kalwan), सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) सिंचन योजनांना (Irrigation schemes) गती देण्याचे काम केले जाणार असून पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Minister of Water Resources and State President of NCP Jayant Patil) यांनी दिली. कळवण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rashtravadi Congress) परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पाटील बोलत होते.

व्यासपीठावर आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar), जेष्ठ नेते श्रीराम शेटे (Shreeram Shete), महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मविप्र संचालक सचिन पिंगळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, कौतिक पगार,

धनंजय पवार, रविंद्र देवरे, नारायण हिरे, चिंतामण गावीत, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, अशोक पवार, बाबुलाल पगार चिंतामण गावीत आदी उपस्थित होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिल्यानंतर स्व. ए. टी. पवारांचा विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम आमदार नितीन पवार हे मतदार संघात करीत आहे.

सुरगाणा आणि कळवणमध्ये गेल्या काळात विकासापेक्षा मोर्चे जास्त निघाले. मोर्चापेक्षा मंत्र्याकडे बसून शासन निर्णय घेण्याचे धोरण आमदार नितीन पवार यांनी राबविले असल्यामुळे ओतूर आणि श्रीभुवनला तरतूद झाली म्हणजे प्रकल्प मार्गी लागला असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले. सिमेंट बंधार्‍यापासून मोठ्या धरणापर्यंत अनेक विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी आमदार पवार यांचा मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा असतो.

पाठपुरावा करण्याची शिकवण स्व ए टी पवारांची (A.T. Pawar) असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्यामुळे दोन्ही तालुक्यात अनेक कामे मंजूर झाली असून कळवण व सुरगाणा तालुक्यातील जलसंधारण विभागाकडील (Department of Water Resources) कामासंदर्भात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी जयंत पाटील यांनी परिवार संवाद निमित्ताने कार्यकर्त्याशी संवाद साधून समस्या जाणून घेत उत्तरे देखील दिले. यावेळी आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील विकासकामांची माहीती देऊन स्व. ए. टी. पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील सिंचन योजना व गिरणा, पुनंद, बेहडी नदीवर सिमेंट बंधारे बांधण्यासाठी सत्ता पक्षाच्या सरकारमध्ये असल्यामुळे मला साथ द्यावी असे साकडे जयंत पाटील यांना घातले.

यावेळी रुपालीताई चाकणकर, सक्षणा सलगर, राजेंद्र पवार, संतोष देशमुख, रणजित गावीत, राजेंद्र भामरे, राऊत बाबा, रामा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सभापती मनीषा पवार, उपसभापती विजय शिरसाठ, मधुकर जाधव, लाला जाधव, भूषण पगार, संदीप वाघ, राजू पवार, जितेंद्र पगार,हेमंत पाटील, संतोष देशमुख, सुवर्णा गांगुर्डे, अलका कनोज, अनुराधा पगार, सपना पगार, चेतन बिरार, छत्रसाल पगार आदी उपस्थित होते. प्रास्तविक राजेंद्र भामरे यांनी केले आभार जितेंद्र पगार यांनी मानले.

Related Stories

No stories found.