वरसविहीर ते बोरीपाडा रस्ता कामात अनियमितता

वरसविहीर ते बोरीपाडा रस्ता कामात अनियमितता
USER

नाशिक | Nashik

पंचायत राज समितीच्या (Panchayat Raj Samiti) त्र्यंबकेश्वर दौऱ्यात तालुक्यातील वादग्रस्त वरसविहीर ते बोरीपाडा (Varasvihir To Boripada Road) रस्त्यांच्या कामातील अनियमतेची व रस्त्यांच्या कामात निधीचा कसा अपहार झाला आहे.

याबाबत निवेदन देत तक्रार करण्यात आली. त्यामुळे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची समितीने साक्ष बोलाविली असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील (ZP Nashik) सबधित अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

तीन वर्षापासून जिल्हयात गाजत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer Taluka) वादग्रस्त वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्यांच्या कामातील अनियमतेची विधीमंडळाच्या पंचायत राज समितीकडे त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे (Motiram Dive), जेष्ठ नेते विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांच्या शिष्टमंडळाने त्र्यंबकेश्वर दौऱ्यात या रस्त्यांच्या कामात निधीचा कसा अपहार झाला आहे. याबाबत निवेदन देत तक्रार केली.

दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा (Nashik District) दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गटनिहाय शुक्रवारी (दि.२७) तालुक्यांचा दौरा करत आढावा घेतला. समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांच्यासह पाच आमदारांनी निफाड (Niphad), सिन्नर व चांदवड तालुक्याचा (Chandwad Taluka) दौरा केला. तसेच आमदार अंबादास दानवे, प्रशांत बंब, दिलीप बनकर, रत्नाकर गुट्टे यांनी बागलाण, कळवण व देवळा या तालुक्यांचा आढावा घेतला.

आमदार विक्रम काळे, मेघनाताई साकोरे, शेखर निकम, क्रिष्णा गजबे यांनी येवला, नांदगाव व मालेगावचा आढावा घेतला. तसेच आमदार डॉ.देवराव होळी, अनिल पाटील, किशोर पाटील, किशोर जोरगेवार यांनी दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यांना भेटी देत पाहणी केली.

आमदार सुभाष धोटे यांच्यासह अमरनाथ राजुरकर, माधवराव जळगावकर, कैलास पाटील व किशोर दराडे यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या तालुक्यांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्ते कामाची तक्रार स्थानिकांनी केली.

वरसविहीर ते बोरपाडा या रस्ते काम बांधकाम विभागाने पूर्ण केलेला असताना जिल्हा परिषदेने संबंधित ठेकेदार ३० लाख रुपये देण्याचा घाट घातला. त्यातील १५ लाख रुपये ठेकेदारास दिलेले असताना ही वसूली अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्यासाठी दिलेला निधी वसूल करण्याची मागणी अनेकदा झाली. मात्र, ठेकेदाराला यात वाचविले जात असल्याचे स्थानिकांनी समिती सदस्यांच्या निर्देशनास आणून दिले. सदर तक्रारींची समिती सदस्यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com