कामकाजात अनियमितता; दोन ग्रामसेवक निलंबित

कामकाजात अनियमितता; दोन ग्रामसेवक निलंबित
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

कोटंबी (ह),(ता. त्र्यंबकेश्वर) येथील ग्रामसेवक (gramsevak) पांडुरंग जाणु खरपडे यांना 10 दोषारोपावरुन व कोमलवाडी, ता. सिन्नर (sinnar) येथील ग्रामसेवक राजेंद्र भाऊराव निकम यांच्यावर दोषारोपावरुन निलंबनाची कारवाई (Suspension action) केली आहे.

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) तथा प्रशासक लीना बनसोड (Administrator Leena Bansod) यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पांडुरंग जाणु खरपडे हे ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे कार्यरत असून त्यांच्याविरुध्द कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते.

त्यानुसार प्रशासक आर.आर.बोडके यांनी दि. 03.11.2021 व 12.01.2022 रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वार अनधिकृत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, ग्रामस्थांना पाणी न मिळणे, कोटंबी हे गांव आदिवासी क्षेत्रात (tribal area) येत असून पेसा व इतर आदिवासी योजनांपासून गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे,

पाणी शुध्दीकरणासाठी (Water purification) टीसीएल पावडर (TCL powder) संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करुन न देणे, गावांत 3 विहिरी असून त्यापैकी कोटंबी येथील एकच विहिरीवर विद्युत कनेक्शन (Electrical connection) नाही. बोरपाडा व बेहेडपाडा या दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सुचना देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहिरीवर पाणी ओढून न्यावे लागते. यास खरपडे हे जबाबदार आहेत. तसेच खरपडे यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे, घरपट्टी (house tax),

पाणीपट्टी (water tax) वसुली न करणे, 15 व्या वित्त आयोगाची 8,10,952/ अनुदान प्राप्त असतांना खर्च केलेला नाही. खरपडे हे अनधिकृत गैरहजर असल्याने त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम (Maharashtra Civil Service (Leave) Rules), 1981 चे नियम 10 चा व महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम (Maharashtra Zilha Parishad, Zilha Seva (Behavior) Rules), 1967 चे नियम 3 चा भंग केलेला आहे. त्यांनी शासकिय कर्तव्यात कसुर केल्यामुळे गटविकास अधिकारी, त्रंबकेश्वर यांनी चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर त्यांना दि. 13 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशानुसार शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी (ता. सिन्नर)येथे कार्यरत असून गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी कोव्हीड 19 व विकास कामांचा आढावा घेणेसाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृत गैरहजर होते. त्यामुळे विकास कामांचा व कोव्हीड 19 रुग्णाबाबतचा आढावा घेता आला नाही. याबाबत निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता कोणताही समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे अनधिकृत गैरहजर असल्याने त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 चे नियम 10 चा व महाराष्ट्र जिल्हा परिषदा,

जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, 1967 चे नियम 3 चा भंग केलेला आहे. तसेच विस्तार अधिकारी (ग्रा.पं) यांनी कोमलवाडी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या नमुना नंबर 1 ते 33 या अपुर्ण अवस्थेत असल्याचे आढळले आहे. तसेच निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी तक्रार केली असुन त्यांचे कामकाज असमाधानकारक असुन त्याचा परिणाम हा ग्रामपंचायतीच्या विकास कामावर व प्रशासनावर होत असल्याने त्यांची अन्यत्र बदली अन्य ग्रामसेवकांची नियुक्ती करावी अशी मागणी केलेली होती, यावर कार्यवाही करत निकम यांना दि.20 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आलेले आहे.

दोन्ही ग्रामसेवकांना त्यांचे कार्यालयीन कामकाज यात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देऊनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com