अनियमित पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

प्रभाग 18 मधील प्रकार; मनपा अधिकार्‍यांना निवेदन
अनियमित पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

प्रभाग क्रमांक 18 ward 18 मध्ये एक वेळा आणि तो ही कमी दाबाने पाणीपुरवठा Water Supply होत असल्याने तो दोन्ही वेळा सुरळीत करण्यात करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक विशाल संगमनेरे Corporator Vishal Sangamnere यांच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांना देण्यात आले.

प्रभाग क्रमांक 18 मध्ये अनेक भागात एक वेळ पाणीपुरवठा होत असून तोही कमी दाबाने होतो. त्यामध्ये पाणी येण्याची निश्चित वेळ नाही. त्यामुळे महिलावर्गाला त्याचा त्रास होत आहे. याबाबत वेळोवेळी पाणी पुरवठा अधिकार्‍यांना विनंती, तक्रार करूनही त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

सध्या सणवार असून महिलांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्याकरिता प्रभाग 18 मधील सर्व भागांमध्ये दोन वेळ, जास्त जास्त दाबाने व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा व महिलांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याबाबत गंभीर दखल घेऊन विभागीय अधिकारी डॉ.मेनकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी, अभियंता यांच्यासोबत प्रभागाचा संयुक्त दौरा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी दर्शन सोनवणे, सचिन रौंदळ, संतोष मते, प्रशांत कळमकर, सुनील धोंगडे, रोहन बनाईत आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.