
लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
बदलत्या वातावरणामुळे कांदा खराब होत असल्याने भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास चांगला प्रतीचा कांदा ग्राहकांना कसा मिळेल, यासाठी आता केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने चार हजार मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कांदा स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी लासलगाव येथील अणु भाभा संशोधन केंद्रात आतापर्यंत सातशे मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली असून शहापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जात आहे तेथील कोल्ड स्टोरेजची क्षमता पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील अंबड येथे साठवला जाणार आहे.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोरेजचे काम प्रगतीपथावर असल्याने लवकरच लासलगाव येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कांदा साठवला जाणार आहे
लासलगाव येथे अणू भाभा संशोधन केंद्राची निर्मिती कांद्यावर विकिरण प्रकियासाठी केले असून या प्रकल्पाची तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 31 ऑक्टोबर 2002 रोजी ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या प्रकल्पात आंंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येते आता मात्र कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येत आहे
विकिरण प्रक्रिया म्हणजे?
लासलगावच्या अणू भाभा संशोधन केंद्रात गॅमा किरणांचा 60 ते 90 ग्रे मात्रा विकिरण मारा केल्याने बदलत्या वातावरणामुळे कांद्याला येणारे कोंब येत नाही त्यामुळे कांदा खराब होत नाही आणि कांदा चांगला राहण्यास मदत होते