कॉम्पुटरशी खेळणार्‍या मुलांना आई मात्र श्यामचीच हवी असते!

ईप्टा नाशिकच्या वतीने ’चारचौघी’ नाटकाचे अभिवाचन
कॉम्पुटरशी खेळणार्‍या मुलांना आई मात्र श्यामचीच हवी असते!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंडियन पीपल थिएटर असोसिएशन (IPTA) नाशिकच्या वतीने ’चारचौघी’ (Charchaughi) या प्रशांत दळवी (Prashant Dalvi) लिखित नाटकाचे अभिवाचन मविप्रच्या आर्किटेक्चर आणि डिझाईन कॉलेजच्या हॉलमध्ये सादर करण्यात आले. याची संकल्पना तुषार कुलकर्णी (Tushar Kulkarni) यांची आहे....

लग्न न करता एका पुरुषासोबत राहून तीन मुलींना जन्म दिलेली आई आणि त्या मुलींच्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडी रंगवणारे स्त्री केंद्रित पुरोगामी नाटक अशी एक वेगळी ओळख ९० च्या दशकात मिळवलेले हे नाटक आहे.

या नाटकाचे अभिवाचन करताना स्त्री पुरुष समानतेला मूलभूत प्रश्न आणि भूमिका घेऊन कणखरपणे उभे राहणारे ’चारचौघी’ हे नाटक आजही समाजमनात खळबळ माजवणारेच आहे.

या अभिवाचनात रंगसूचना वृंदा कुलकर्णी यांनी वाचली तर ओम शेवाळे, अर्पिता अभिजित, पूजा पुरकर, शिल्पा देशमुख, निकिता झालटे, सुशील खरे, इंद्रजित घोरपडे यांनी भूमिका साकारल्या.

ध्वनीयोजना हर्षल पवार तर व्हिडीओ आणि फोटो दस्ताऐवजीकरण योगेश गोवर्धने आणि पायल जोशी यांनी केले. व्यवस्थापन कृष्णा कांगणे यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com