IPL-2022 : लखनौचा कोलकात्यावर विजय

IPL-2022 : लखनौचा कोलकात्यावर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( Kolkata Knight Riders Vs Lucknow Super Giants ) यांच्यात खेळण्यात आला. यात लखनौच्या संघाने बाजी मारली.

लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.लखनौच्या संघाकडून सलामीला क्विंटन डी.कॉक. व लोकेश राहुल फलंदाजीस आले. सलामीला आलेल्या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. आजच्या सामन्यात कोलकताच्या संघाला लखनौचा एकही गडी बाद करता आला नाही. लोकेश राहुलने ५१ चेंडूत ४ षटकार व ३ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत नाबाद एकूण ६८ धावा केल्या. क्विंटन डी.कॉकने देखील अखेरच्या षटकापर्यंत लढत देत ७० चेंडूत १० षटकार व १० चौकार झळकवत धावांचे शतक पूर्ण करत नाबाद एकूण १४० धावा केल्या. २० व्या षटका अखेर लखनौच्या संघाने २१० धावा केल्या.

लखनौच्या संघाने दिलेल्या २११ धावांचे आव्हान स्वीकारत कोलकाताच्या संघाकडून व्यंकटेश अय्यर व अभिजित तोमर सलामीला फलंदाजीस आले. पहिल्या षटकातच मोहसीन खानच्या गोलंदाजीवर डी. कॉकने व्यंकटेश अय्यरला शून्यावर झेल बाद करत तंबूत पाठविले.अभिजित तोमर ने ८ चेंडूत ४ धावा करत लोकेश राहुल कडून झेल बाद झाला.

नितीश राणाने आक्रमक फलंदाजीस सुरवात करत २२ चेंडूत ४२ धावा केल्या. श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत एकून ५० धावा केल्या.दीपक हुड्डा ने श्रेयस अय्यरला झेल बाद केले. सॅम बिलिंग्जने २४ चेंडूत ३६ धावा करत क्विंटन डी कॉक कडून स्टंप आउट झाला. दीपक हुड्डाने आंद्रे रसेलला ५ धावांवर झेल बाद करत माघारी पाठविले. रिंकू सिंघ ने आक्रमक फलंदाजी करत कोलकाताच्या संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल केली परंतु इव्हिन लुईस ने रिंकू सिंघला झेल बाद केले. रिंकू सिंघ्ने १५ चेंडूत ४ षटकार व २ चौकार लगावत ४० धावा केल्या.

विसाव्या षटका अखेर कोलकाताच्या संघाने ८ गडी बाद २०८ धावा केल्या. लखनौच्या संघाने कोलकात्यावर २ धावांनी विजय मिळविला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com