शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करा

विद्यार्थी शोधमोहीम बैठकीत तहसीलदारांचे आदेश
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करा

सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना (Out-of-school students) शिक्षणाच्या प्रवाहात (stream of education) सामील करुन घेण्यासाठी गाव पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचे सहकार्य घ्यावे.

शोधमोहिमेनंतर गावपातळीवर शाळाबाह्य मुले आढळून आल्यास प्रशासकीय यंत्रणेलाच जबाबदार धरण्यात येईल, असे प्रतिपादन शाळाबाह्य शोधमोहिमेचे अध्यक्ष सचिन मुळीक यांनी केले. सुरगाणा (surgana) येथील तहसील कार्यालयात (Tehsil Offices) शोध मोहीम बैठकीचे आयोंजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी समितीचे सदस्य गटविकास अधिकारी दीपक पाटील, गट शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे, संजय कुसाळकर, मंगला गायवन, शाळेचे मुख्याध्यापक रतन चौधरी, गणेश पालवे, योहान वाघेरे आदी बैठकीत उपस्थित होते. सचिन मुळीक यांनी सांगितले की, आदिवासी भागात (tribal area) महिलांचे शिक्षणाचे (women's education) प्रमाण कमी आहे. आजही महसूल विभागातील (Department of Revenue) विविध प्रकारच्या योजनांचे लाभ घेतांना 20 ते 25 वयोगटातील काही तरुण, तरुणी अंगठा टेकवतात.

ही बाब आजच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या व भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी युगात शरमेची आहे. याचा अर्थ ते शिक्षणाच्या प्रवाहा पासून वंचित होते. असे पुढील काळात होऊ नये यासाठी शासनातर्फे शाळाबाह्य विद्यार्थ्यांकरिता (students) शोधमोहीम हाती घेतली आहे. यासाठी गावपातळीवर शासकीय यंत्रणेने सहभागी होऊन शोध मोहीम फत्ते करायची आहे.

यावेळी गट शिक्षणाधिकारी कोळी (Group Education Officer Koli) यांनी 5 जुलै पासून 3 ते 6, तसेच 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण (Survey of children) करण्यात येईल. यामध्ये वीट भट्टीमजूर, कारखाना,स्थलांतरित मजूर यांची मुले ही शोध मोहिमेत घेतली जातील. या मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे करण्यात येऊन एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची खात्री दिली. या मोहिमेत गावपातळीवरील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ञ, सेवा ज्येष्ठ मुख्याध्यापक आदी या शोध मोहीमेत मदत घेतली जाणार आहे.

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) एकही मूल शाळाबाह्य राहु नये,यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे व मिशन झिरो ड्रॉप आऊट (Mission Zero Drop Out) यशस्वी करावे, असे आवाहन दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) यांनी केले. दिंडोरी तहसील कार्यालयात नियोजन बैठकप्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. तहसीलदार पंकज पवार यांचे दालनात आयोजित बैठकप्रसंगी गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे, गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बर्डे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. इन. कव्हले, प्रशांत पोतदार,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. सोनार, विषयतज्ज्ञ आरती डिंगोरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आर. व्ही. नाठे आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले. पुढे बोलताना तहसीलदार पंकज पवार यांनी 23 जून च्या शासन निर्णयानुसार दिंडोरी तालुक्यात दि.5 ते 20 जुलै दरम्यान मिशन झिरो ड्रॉपआऊट वाडी वस्त्यांवर,साखर कारखाने परिसर, वीटभट्टी, औद्योगिक वसाहत आदी भागात राबविली जाणार आहे.

वयोगट 3 ते 18 मधील जे विद्यार्थी कधीही शाळेत गेले नाही किंवा शाळेत दाखल झाले नाही. स्थलांतरित बालके,अनियमित शाळेत येणारी बालकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ शाळेत दाखल करावे. या मोहिमेत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करावी असे नमूद केले. सामाजिक जबाबदारी म्हणून शाळाबाह्य मोहीम राबविण्यात यावी व सर्व यंत्रणा यांनी या मोहिमेत सहभागी होऊन शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यासाठी योगदान द्यावे असेही त्यानी नमूद केले. नागरिकानी आपल्या परिसरात शाळाबाह्य मूल आढळल्यास नजीक च्या शाळेत संपर्क करून आशा वंचित मुलांना शिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com