राज्यपालांना नाशिक भेटीचे निमंत्रण

राज्यपालांना नाशिक भेटीचे निमंत्रण

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari यांना नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे MLA Sima Hire यांनी नाशिक जिल्हा भेटीचे निमंत्रण दिले. त्यांनी नुकतीच राजभवन येथे त्यांची भेट घेतली.

नाशिक जिल्हा पौराणिक इतिहास असलेला जिल्हा असून दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा, गोदावरी नदीजवळ असणार्‍या पंचवटीमध्ये भगवान रामाचा वनवास काळ तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेले वणी येथील भगवती सप्तशृंगी मातेचे मंदिर, काळाराम मंदिर अशी अनेक धार्मिक स्थाने आहेत.

तसेच नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत असा कृषी उत्पादन करणारा समृद्ध जिल्हा आहे. द्राक्ष ऊस, कांदा तसेच डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचा एक क्रमांक लागतो. तसेच धार्मिक, पर्यटन, कृषी पर्यटन याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील निसर्गाने वेढलेल्या पर्वत रांगांमध्ये पर्यटनाचे अनेक नवे केंद्र येथे निर्माण झाले आहेत.

अशा धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक त्याचप्रमाणे औद्योगिक दृष्टीने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात विकसनशील अवस्थेत असलेल्या नाशिक जिल्ह्यास आपण भेट द्यावी अशा विनंतीचे निवेदन दिले. यावेळी भाजप नेते महेश हिरे, सुशील नाईक आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.