खा.राहुल गांधी यांना कुंभमेळ्याचे आमंत्रण

- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील
खा.राहुल गांधी यांना कुंभमेळ्याचे आमंत्रण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra ) खा. राहुल गांधी( MP Rahul Gandhi ) यांनी नाशिक व त्र्यंबकेश्र्वर कुंभमेळ्याची माहिती नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्याकडून घेतली.

भारत जोडो यात्रेचे जोमाने, ऊर्जेने व उत्साहाने ठिकठिकाणी या यात्रेचे सर्व जिल्ह्यांमध्ये स्वागत झाले. यात्रेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील आयोजन कमिटीचे सदस्य असलेल्या नाशिक युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी खा. राहुल गांधी यांच्याशी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत तसेच पंचवटीचे पौराणिक महात्म्य, त्र्यंबकेश्र्वर देवस्थान याबाबतीत दिलखुलास चर्चा केली. तसेच येत्या ' कुंभमेळ्यास ' शाही स्नान ' व ' ध्वजारोहण ' सोहळ्यास येण्याचे आमंत्रण नाशिककरांतर्फे स्वप्निल पाटील यांनी खा. राहुल गांधी यांना दिले.

भारत जोडो यात्रेत चालत असताना पहिल्या दिवसापासून खा.राहुल गांधी त्या-त्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक माहिती जाणुन घेत आहेत, समजून घेत आहेत.

ही यात्रा बुलढाणा येथे असताना राहुल गांधी यांनी स्वप्निल पाटील यांच्याकडून संपूर्ण कुंभमेळ्याची माहिती घेतली. " शाही स्नान", नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर , तसेच उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागांवरील माहिती जाणून घेऊन या येत्या कुंभमेळ्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेल असे सुतोवाचही केले. स्वप्निल पाटील यांनी संपूर्ण यात्रा चालत यात्रेच्या नियोजनातील कमिटी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com