जिंदाल दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली

जिंदाल दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव (mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड (Jindal Polyfilms Compant) कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या (fire) दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (Upper Collector Babasaheb Pardhe) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.

मुंढेगाव येथे सुमारे अडीचशे एकरांत जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी (दि.१) लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा (women workers) भाजून मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत उच्च स्तरीय समितीद्वारे या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले.

यासंदर्भात सोमवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात अधिकाऱ्यांची चर्चा झाली. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती नेमून या समितीमार्फत या घटनेची चौकशी (Investigation) करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector Gangatharan D) यांनी घेतला आहे. त्यामूळे अपर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com