इंडोनेशियात गुंतवणूक करा

नाशिकच्या उद्योजकांना कॉन्स्यूलेट जनरल यांचे आवाहन
इंडोनेशियात गुंतवणूक करा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

भारतातील उद्योजकांना (Entrepreneurs in India ) इंडोनेशियातील ( Indonesia) सर्व क्षेत्रात मोठी संधी असून,त्यासाठी इंडोनेशिया सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.भारतीय उद्योजकांनी इंडोनेशियात गुंतवणूक करण्याचे आवाहन इंडोनेशियाचे कॉन्स्यूलेट जनरल अ‍ॅगस पी.सॅप्टोनो (Consulate General of Indonesia, Angus P. Saptono )यांनी केले.

आयमा ( AIMA ) व इंडोनेशिया ( Indonesia) गुंतवणुकीबाबत आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के आर बुब हॉलमध्ये झालेल्या बैठकीत युनिव्हर्सल बिझनेस व कॉर्पोरेट सर्व्हिस सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ शाह, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, विश्वस्थ समिती अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बुब, सचिव योगीता आहेर, उपसमिती अध्यक्ष सिध्देश राईकर हे होते.

यावेळी कॉन्स्युलेट जनरल अ‍ॅगस पी.सॅप्टोना यांनी इंडोनेशियाच्या विविध क्षेत्रातील क्षमतांची माहिती सादर केली.यात भारतासोबत व्यवसायीक संबंध घट्ट करण्यावर भर देत असल्याचे सांगतानाच राज्यासोबतच नाशिकचा विशेष विचार करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही क्षेत्रांचा उल्लेख करताना फार्मासिटीकल, इलेक्ट्रीक व्हेईकल, इलेक्ट्रिक बॅटरी मॅन्यूफॅक्चरींग या सारख्या क्षेत्रामध्ये प्राधान्यक्रमाने लक्ष देणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उद्योजकांनी इंडोनेशियात गुंतवणुकीबाबत व नवीन उद्योगांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करून त्यांचे समाधान केले.

यावेळी बोलताना सौरभ शाह यांनी या चर्चेतून दोन्ही बाजूने व्यवसाय संधींना प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल इंडानेशियन कॉन्स्यूलेट जनरल यांचे अभिनंदन केले. भारतीय उद्योगांना इंडोनेशियात मोठ्या संधी असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

आयमांचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी प्रास्ताविकात आयमाच्या माध्यमातून इंडोनेशिया व भारत यांच्यातील उद्योग व्यापार कशाप्रकारे वाढवता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यासाठी इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाला उद्योजकांच्या चर्चेसाठी बोलावले असल्याचे सांगितले.यामुळे नक्कीच संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करताना उद्योजकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी उद्योजक हर्षद बेळे यांनी घनकचरा व्यवस्थनाबाबत प्रश्न मांडून नवीन संधी बाबत आपल्या सूचना मांडून चर्चा केली. यावेळी इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने त्यांना उद्या होणार्‍या त्यांच्या उद्योगधंद्यांच्या बैठकीसाठी आमंत्रण दिले.

सूत्रसंचलन सिध्देश राईकर यांनी केले तर आयमाचे सरचिटणीस ललित बुब यांनी आभार मानले. यावेळी ब्ल्यू क्रॉस उद्योगाचे अशोक गुप्ता, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, प्रमोद वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, जयंत जोगळेकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार , देवेंद्र राणे, विराज गडकरी, रवींद्र झोपे, मनीष रावळ, धीरज वडनेरे, देवेंद्र विभुते, रवींद्र महादेवकर उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com