निमा विश्वस्त पदासाठी मुलाखती

निमा विश्वस्त पदासाठी मुलाखती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निमाच्या (NIMA)नूतन विश्वस्त निवडीच्या प्रक्रियेला (process of selecting a new trustee )गती मिळाली असून, लवकरच नामनिर्देशित केलेल्या 40 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात येणार असून, त्यातून योग्य उमेदवारांतून विश्वस्त मंडळांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त असल्याने उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील उद्योजकांची संघटना असलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)संस्थेवर धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाने दीड वर्षापूर्वी तीन सदस्यीय प्रशासक समिती नेमली आहे. त्यामुळे संस्थेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

निमात दोन गटांत वाद असल्याने संस्थेवर योग्य व्यक्तीची (फिट पर्सन) नियुक्ती करण्याची शिफारस सह.धर्मादाय आयुक्तांकडे धर्मदाय उपायुक्तांनी केली होती. या शिफारसीनुसार धर्मादाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांनी डिसेंबर 2020 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिपटे, धर्मादाय निरीक्षक पंडितराव झाडे, अ‍ॅड. देवेंद्र शिरोडे यांची तीन सदस्यीय प्रशासकीय समिती नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

या प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून मागिल दिड वर्षापासून ‘निमा’चा कारभार सुरू आहे. निमावर विश्वस्तांची नेमणूक करण्याच्या दृष्टीने धर्मदाय सहआयुक्तांनी पात्र उद्योजकांकडून अर्ज मागविले होते.त्यात42 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 2 अर्ज बाद झाल्याने 40 इच्छुक उद्योजकांनी अर्ज दाखल आहेत.

या अर्जाची छाननीनंतर मुलाखती घेण्यात येणार होत्या मध्यंतरी कोवीडच्या लॉकडाऊनमुळे त्या घेता आलेल्या नसल्यातरी आता सर्व सुरळीत झाल्याने लवकरच प्रलंबीत मुलाखती घेऊन विश्वस्त मंडळाच्या नेमणूक करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून थंडावलेल्या निमाचा कारभाराची सूत्र विश्वस्त मंडळाकडे सोपवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.