असा लागला मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा तपास

असा लागला मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा तपास

नाशिकरोड | Nashikroad

गेल्या काही दिवसापासून नाशिक रोड (Nashikroad) व शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे (Mobile Stolen) प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. त्याप्रमाणे मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या, परंतु मोबाईल चोर सापडत नव्हते...

अखेर उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावला असून तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) राहणाऱ्या सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे ५४ मोबाईल जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी उपनगर पोलिसांनी केली असून या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी उपनगर पोलिसांची पाठ थोपटली आहे.

मोबाईल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Dipak Pandey) यांनी संबंधित पोलिस ठाण्याला आदेश देऊन मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा तपास करा असा आदेश दिल्यानंतर पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे त्यांचे सहकारी पोलिसांनी परिसरात ठिकाणी नाकाबंदी करून मोबाईल चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अखेर जेरबंद केले आहे. हे सर्वजण तामिळनाडू येथे राहणारे आहे.

मुरली मुरगन जगदीश, पलाने व्यंकटेश, शंकर मंगेश पेरूमल, मोहन रंगन, आरमुघम सुब्रमनी अशी त्यांची नावे आहेत. या टोळीकडून सुमारे ५४ मोबाईल जप्त करण्यात आली आहे.

या टोळीकडून अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील हे करत आहे.

त्याच प्रमाणे उपनगर पोलिसांनी आणखी एका चोरीचा छडा लावला असून तीन दिवसापूर्वी महापालिकेच्या सुभाष रोड येथील महात्मा गांधी सभागृहातून अज्ञात चोरट्याने १३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.

त्यामध्ये दहा हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा, दोन हजार रुपये किमतीचे केबल वायर, एक हजार रुपये किमतीचे बल्ब असा ऐवज चोरून नेला होता.

याप्रकरणी देवानंद शिंदे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, महिला पोलीस निरीक्षक तेजल पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक साळवे, काशिनाथ गोडसे आदींनी तपास करून अर्जुन खंडू मस्के (रा. इगतपुरी) याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com