एचएएल प्रकरण : एटीएसकडून शिरसाठची कसून चौकशी

एचएएल गुप्त माहिती पाकिस्तानला दिल्याचे प्रकरण
एचएएल प्रकरण : एटीएसकडून शिरसाठची कसून चौकशी

नाशिक । Nashik

हिंदुस्थान अ‍ॅरोनॅटिक्स लिमीटेड (एचएएल) कंपनीत तयार होणार्‍या विमानांची, तसेच कंपनीची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविण्यार्‍या शिरसाठची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.

यामध्ये त्याशिवाय इतर कोणाचा सहभाग अद्याप समोर आलेला नाही. मात्र त्याच्याकडील मोबाईल, सीम कार्ड, मेमरी कार्ड अशा इतर तांत्रिक पुराव्यांचा अभ्यास एटीएस करत आहे.

दिपक शिरसाठ (41, रा. जत्रा हॉटेल परिसर, आडगाव, मुळ सिन्नर) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

तो दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत असून एटीएसचे पथक त्याच्याकडे चौकशी करत आहे. तर अधिक तपासासाठी दहशजवादीविरोधी पथक एचएएलमध्ये तळ ठोकून असून पथकाने वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचार्‍यांकडे चौकशी करत शिरसाठी बाबत तसेच इतर तांत्रिक बाबींची माहिती घेतली जात आहे.

देशातील विमान, कंपनी, प्रतिबंधीत क्षेत्र, विमानाचे तंत्रज्ञान अशा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पाकिस्थानची गुप्तहेर संघटना आयएसआयला पुरविली जात असल्याची माहिती दहशतवादविरोधी विभागाला मिळाली होती.

एटीएसचे अपर पोलिस महासंचालक देवेन भारती, पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या पथकाने तपास करीत संशयित शिरसाठ यास जेरबंद केले आहे.

एटीएसच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपास आपल्या हाती घेतल्याने या प्रकरणातील गांर्भिय वाढतच चालले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com