नाशिक |Nashik (प्रतिनिधी)

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरासह, जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा गौरव तसेच कराेनाच्या पार्श्वभूमीवर कराेना याेद्धा असलेल्या महिलांचा सन्मान करून त्यांना कार्याला सलाम करण्यात आला.

केटीएचएम महाविद्यालय

'जागतिक महिला दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन केटीएचएम महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग, महिलांच्या समस्या - स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, निरक्षरता, आरोग्य, इ. तसेच स्त्री आणि पर्यावरण, शेती, राजकारण, विज्ञान, आवकाश, लष्कर, नोकरी, ऊद्योग, व्यवसाय अशा विविध समर्पक विषयांवर प्रबोधनात्मक पोस्टर प्रदर्शित केले. त्यातुन महिलांची विविध क्षेत्रातील कामगिरी तसेच आजची स्त्री व त्यांच्या पुढील समस्या यावर प्रकाशक टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. पी.व्ही. कोटमे, उपप्राचार्य मुठाळ, राज्यशास्त्र राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. कल्पना आहिरे, प्रा. रमेश निकम उपस्थित होते.

स्त्रीशक्तीच्या गौरवासाठी ऑनलाइन टाळ्या

जागतिक महिला दिनानिमित्त यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वॉव समूहाने आभासी संमेलन आयोजित केले. याच ५०० महिलांनी सहभाग नोंदविला. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची उर्मी नेहमी सोबत असावी. त्यामुळे स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी, स्वतः करता टाळ्या वाजवा" या आवाहनास दाद देत ५०० महिलांनी एकत्रित स्वतः साठी टाळ्या वाजविल्यात.

संमेलनाच्या प्रास्ताविकात वॉव समूहाच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी न्याहारकर यांनी सांगितले " वॉव - वुमन ऑफ विस्डम हा समूह महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य मागील ५ वर्षांपासून करीत आहे. समूहाद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येत असलेला विशेष उपक्रम, महिलांची दुचाकी रॅली ही शहराची ओळख झाली आहे. संमेलनकरीता रेखा देवरे, विद्या मुळाणे, आद्या टकले, मीनल विसपुते, श्रुती भुतडा, दर्शना सराफ, मनीषा आहेर, शुभांगी कोठुळे, माधुरी कोतवाल, संगीता मदन, शालिनी सुर्वे, सीमा बयनवार, वर्षा भांगळे, नमिता राजहंस, शिल्पा दरगोडे, अर्चना बोथरा, मनीषा आहेर यांनी सहभाग घेतला.

विशेष मुलींसोबत महिला दिन

मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेले मूल विशेष असते. समाज त्यांना ‘विशेष’ असं संबोधत असला तरी, त्यांच्या या विशेष असण्याला चारही बाजूने असहायतेची किनार असते. विशेषतः अशा मुली आणि महिलांच्या बाबतीत हा प्रश्न मोठा असतो. समाजातील या उपेक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी नाशिकमधील ‘घरकुल’ संस्था धडपड करत आहे. महिला दिनानिमित्त अभिनव लेडीज ग्रुप, नाशिक यांच्या वतीने त्यांना ग्राइंडर मिक्सर संस्थेला भेट देण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या प्रमूख विद्या फडके, अभिनवच्या संस्थापक रजनी जातेगांवकर यांनी महीला दिन हा फक्त मुख्य धारेतील महिलांसाठीच नाही तर या विशेष मुलींसाठी अधिक महत्वाचा आहे. त्यांना आत्मनिर्भर बनवत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे,,असे सांगितले. या प्रसंगी रंजना तांबट, उषा जातेगांवकर, सुरेखा तांबट, विमल कलंत्री, हेमा झंवर, नयना भुतडा, लीना तांबट, राजश्री चांडक या उपस्थित होत्या.

महिलांच्या, समस्या, अन्याय दूर होणे गरजेचे - जाधव

महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहे. ज्ञान व शिक्षण यातूनच समाजपरिवर्तनाची शक्ती महिलांमध्ये निर्माण होर्इल आणि या शिक्षणाच्या प्रसारातूनच महिलांचे दुःख, समस्या व अन्याय दूर होतील. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन ज्येेष्ठ कवियत्री वैशाली जाधव यांनी 'सातपूर येथील मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात 'जागतिक महिला दिनानिमित्त' आयजित कार्यक्रमात व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी उशीर यांनी प्रास्ताविकातून महिला दिनाचे महत्व विशद केले तसेच महिला प्राध्यापिकांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. जी. गांगुर्डे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. एस. एस. वारूंगसे यांनी केले.

सीए, सीएसतर्फे महिला दिन

दि. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट ऑफ इंडिया, दि. इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट एकाउंटेंट ऑफ इंडिया आणि दि. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या नामांकित संस्थांच्या नाशिक शाखेतर्फे नाशिकमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस सीए रश्मी लोणीकर यांनी सर्वांचे स्वागत केले. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राजेंद्र शेटे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

यामध्ये वीणा माजगावकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या करियर, कॉर्पोरेट तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा उलगडा केला. प्रसिद्ध कादंबरीकार पूजा परसून या देखील ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यात यश आणि अपयशांबद्दल तिने आपले वैयक्तिक अनुभव सामायिक केले. या कार्यक्रमाला सीए, सीएमए तसेच सीएसचे सर्व सभासद, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सीएमए अर्पिता फेगडे यांनी आभार मानले. सीए राजेंद्र शेटे, सीए राकेश परदेशी, सीए रश्मी लोणीकर, सीएमए कैलास शिंदे, सीएमए मयूर निकम तसेच सीएस पायल व्यास, सीएस रवींद्र उत्तेकर व सीएस अनघा केतकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

मराठा हायस्कूल

मराठा हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते आणि सर्व ज्येष्ठ शिक्षिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील जेष्ठ शिक्षिका शरयू नवले, मिराबाई काळे, प्रतिभा उशीर, संगीता आहेर, मंदाकिनी कदम, क्रांतीदेवी ठाकरे यांच्या हस्ते सरस्वती, राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यालयातील सर्व स्त्री शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक रमेश तासकर यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना गाजरे यांनी केले तर आभार संजय डेर्ले यांनी केले.