नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिकमध्ये अनेक बास्केटबॉल मैदान तयार होत आहे. त्यामुळे बास्केटबॉलला पूरक असे वातावरण तयार झाले आहे. यातून नाशिकमधून जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आदित्य अष्टेकर यांनी व्यक्त केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा क्रीडाअधिकारी रवींद्र नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय क्रीडांगण विकास अनुदान व संस्थेच्या निधीतून उत्तम असे बास्केटबॉल मैदान साकारले आहे. संस्थेला यापुढे ही क्रीडा क्षेत्रासाठी काही मदत लागल्यास जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अश्विनीकुमार येवला यांनी सर्वच शाळा व महाविद्यालयात आधुनिक पद्धतीचे मैदान तयार करून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमतेवर लक्ष दिले जाणार आहे, असे सांगितले.

डॉ. राजेंद्र कलाल यांनी नाशिकरोड, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुलातील शाळांना अशाच पद्धतीचे क्रीडा कार्यालयाकडून निधी मिळावा व तेथेही या सुविधा तेथील विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मारुतीराव कुलकर्णी, सचिव अश्विनीकुमार येवला, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, मयूर कपाटे, शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, अविनाश खैरनार, अंबादास तांबे, अजिंक्य दुधारे, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव जाकीर सैय्यद, बास्केटबॉल, प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर, पर्यवेक्षिका स्मिता पाठक आदी उपस्थित होते.

जेष्ठ क्रीडा संघटक मंदार देशमुख, शशांक वझे, कैलास ठाकरे, महेश पठाडे, विजय बनछोडे, बास्केटबॉल प्रशिक्षिका स्वरांजली सहस्त्रबुद्धे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदी उपस्थित होते.