बालपणीच सामाजिक कार्याची आवड; रिशा राठीचे सर्वत्र कौतुक

बालपणीच सामाजिक कार्याची आवड; रिशा राठीचे सर्वत्र कौतुक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सुकेशीनी असण्याचा आनंद प्रत्येक महिलेला असतो. मात्र आपल्या वाढदिवसाच्या( Birthday) दिवशीच सौदर्याचे आभूषण असलेल्या केसांचे दान hair donation) देऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या जिवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न 8 वर्षाच्या रिशाने केल्याने तीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

उद्योजक हेमंत राठी (Entrepreneur Hemant Rathi)यांची 8 वर्षाची नात रिशा आनंद राठी (Risha Anand Rathi) हिन आपल्या वाढदिवशी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या (cancer patients) केस रोपणा करिता दान करण्याचा निर्णय घेतलेला होता या निर्णया मागे एक वर्षापूर्वी तिची आई डॉक्टर मेघा राठी यांनी केस दान केले होते ते पाहिल्यानंतर स्वयंस्फूर्तीने रिशाने स्वत:चे 13 इंच लांबीचे केश कापून महीलांसाठी काम करणार्‍या हेअर फार होप इंडिया प्रोटेक्ट युवर मॉम ऐशीया या संस्थेस नासिक लेडीज सर्कल 119च्या माध्यमातून दान केले.

कॅन्सर रुग्णांच्या केमो उपचारानंतर केस जाणे ही बाब रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणारी असते त्यांना या आजारावर मात करता येईल यासाठी प्रत्येकाने त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पूढे येणे गरजेचे आहे.

रिशा आनंद राठी हिने आपले 13 इंच केस आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेत दिले तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यातुन बालपणातच सामाजिक कार्य करण्याची वृत्ती ही रिशाच्या अंगी दिसुन येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com