आंतर जिल्हा बदली प्रक्रिया : ऑनलाईन भरावयाच्या माहितीत गोलमाल

आंतर जिल्हा बदली प्रक्रिया : ऑनलाईन भरावयाच्या माहितीत गोलमाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेत ऑनलाईन माहिती भरताना फेरफार करण्यात आल्याची चर्चा आहे. यात या आकेडवारीवरून, नाशिक जिल्हयात शिक्षक दाखल झालेल्या या ३४ शिक्षकांना पदस्थापना देतांना जिल्हा परिषद (Zilla Parishad) अडचणीत आली आहे...

आकडयांमध्ये गोलमाल झाल्याचे पुढे आल्याने या विभागाचा उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार असलले निलेश पाटोळे (Nilesh Patole) यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांचा देखील पदभार काढला आहे. यामुळे शिक्षण विभाग पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

शिक्षण विभागातंर्गत गत महिन्यात प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया राज्यस्तरावर ऑनलाईन पध्दतीने राबविली जाते. प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात येण्यासाठी शिक्षकांची संख्या बघितली जाते. त्यानुसार वजा २६४ अशी संख्या असल्यामुळे नाशिक जिल्हयात येण्यासाठी एकही शिक्षक पात्र ठरत नाही. याउलट नाशिक जिल्हयातील शिक्षक बाहेरच्या जिल्हयात जाऊ शकतात. अशी परिस्थिती असताना वजा २६४ हा आकडा शिक्षण विभागाने थेट शून्य दाखविला असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे ऑनलाईन बदली प्रक्रियेत नाशिक जिल्हयात ३४ शिक्षक दाखल झाले आहेत. नियमाप्रमाणे आता त्यांना पदस्थापना द्यावी लागेल. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उपशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांचा पदभार काढून घेत सुरगाणा येथील गट शिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कोळी यांनी अधिकृतपणे या पदाचा अतिरीक्त कार्यभार हाती घेतला.

मात्र, शिक्षकांच्या बदलीसाठी जिल्हा पात्र ठरत नसताना आकडयांमध्ये फेरफार कुणाच्या सांगण्यावरुन आणि कशासाठी करण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित केला आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकाºयांचा सहभाग असल्याची चर्चा असून आर्थिक देवाण-घेवाण यातून हा प्रकार झाल्याची चर्चा शिक्षण विभागातंर्गत आहे.

पटोळे यांच्या समवेत प्रभारी पदभार सांभाळत असलेले डॉ. मच्छिंद्र कदम यांच्याकडील अतिरीक्त कार्यभार हा दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांच्याकडे सोपविणयात आला आहे. केवळ पदभार काढण्याची कारवाई करण्यापेक्षा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com