नाशिक | Nashik

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तरेकडुन मध्ये भारतात शितल वारे वाहत असल्याचे परिणाम दिल्लीपासुन महाराष्ट्रापर्यत जाणवू लागले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात महाराष्ट्रातील पारा घसरला गेल्यानंतर पुन्हा हीच स्थिती राज्यात तीन दिवसापुर्वी राहिली. या बदलानंतर गेल्या दोन दिवसात पारा पुन्हा 10 अंशावर विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाल्यानंतर पुन्हा पारा 10 ते 11 अंशापर्यत खाली आला आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पारा 7 डिसेंबर रोजी 10.5 पर्यत गेला असतांना आज 13.2 अंश सेल्सीअस असा वर आला. यामुळे जिल्ह्यातील थंडीची तीव्रता काहीसी कमी झाली आहे.

उत्तर भारतात बदलेल्या हवामानामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या भागात किमान तापमानात नोव्हेंबर महिन्यात किंचीत घट झाल्याने राज्यात पुन्हा थंडीचे आगमन झाले होते.

गेल्या 12 नोव्हेंबर रोजी राज्यात पारा 12 वरुन 9.5 अंशापर्यत खाली आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यात 10.4 अंश असे किमान तापमान नोंदविले गेले होते. यानंतर राज्यातील पुन्हा एकदा किमान तापमान घसरल्याने 7 डिेंसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात 10.5 अशा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती.

तर तसेच निफाड येथील पारा 9 अंशांपर्यत खाली आला होता. आज अचानक पारा दोन ते तीन अंशांनी वर गेल्याने जिल्ह्यातील थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. असे असले तरी नागरिकांना गरम कपडे व शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

सकाळपासुन ढगाळ वातावरण असल्याने पुन्हा द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढली आहे.