शेतमाल हमीभावासाठी तीव्र लढा उभारणार: अ‍ॅड. परदेशी

शेतमाल हमीभावासाठी तीव्र लढा उभारणार: अ‍ॅड. परदेशी

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

धुळे जिल्ह्यातील (dhule district) वन व गायरान जमिनींसाठी शिरपूर (shirpur) ते धुळे (dhule) पायी मोर्चा काढून किसान सभेने (kisan sabha) आदिवासी बांधवांना (tribal communuty) न्याय मिळवून दिला. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात (nashik district) देखील वन व गायरान जमिनींबाबत एकजुटीने तीव्र लढा उभारण्याचा निर्धार अ‍ॅड. हिरालाल परदेशी (Adv. Hiralal Pardeshi) यांनी व्यक्त केला.

मालेगाव (malegaon) रस्त्यावरील गुप्ता लॉन्समध्ये किसान सभेच्या नाशिक जिल्हा अधिवेशनात (Nashik District Convention) मार्गदर्शन करतांना अ‍ॅड. परदेशी बोलत होते. अध्यक्षस्थानी कष्टकर्‍यांचे नेते व किसान सभेचे सचिव राजू देसले होते. तळपत्या उन्हातही अधिवेशनास मोठ्या संख्यने श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते. तत्पुर्वी शासकिय विश्रामगृहापासून अधिवेशन स्थळापर्यंत प्रचंड रॅली (Rally) काढण्यात आली. हाती लाल बावटा घेत, घोषणा देत निघालेल्या या रॅलीने नांदगावकरांचे लक्ष वेधून घेतले.

शेतकर्‍यांची (farmers) एकजूट उभारून हमीभावासाठीचा लढा तीव्र करण्यासोबतच वनजमिनींचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. या लढ्यासोबतच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी देखील लढाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. परदेशी यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे (Maharashtra state Kisan Sabha) 22 वे राज्य अधिवेशन शिरपूर येथे 28 व 29 मेरोजी होणार असून नाशिक जिल्ह्यातील (nashik district) शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना कॉ. देसले म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आगामी काळात तीव्र आंदोलन (agitation) करण्यात येईल. शेतकर्‍यांना गावपातळीवर कर्जपुरवठा होण्यासाठी विकास सोसायटी मजबूत झाल्या पाहिजेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Co-operative Bank) अडचणीत आल्यामुळे 12 लाख ठेवीदार, शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळ शेतकर्‍यांच्या विकासासाठी महत्वाची आहे. ती बळकट करण्यासाठी किसान सभा लढेल.

नाशिक जिल्हा शेतकरी चळवळ (Nashik District Farmers Movement) ऐतिहासिक करणारा आहे. कॉ. माधवराव गायकवाड (Madhavrao Gaikwad) यांच्या चळवळीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करू या, असे आवाहनही त्यांनी केले. अ‍ॅड. साधना गायकवाड, ज्येष्ठनेते दामू पाटील यांनीही मार्गदर्शन केले. राज्य अधिवेशनासाठी काढण्यात आलेल्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनस्थळास किसान सभेचे दिवंगत राज्याध्यक्ष कॉ. माधवराव गायकवाड नगर तर प्रवेशद्वारांना कॉ. शंकर गंभीर, फकिरा पवार, कॉ. नामदेवराव गावडे या दिवंगत सहकार्‍यांची नावे देण्यात आली होती. भास्कर शिंदे यांनी प्रास्ताविक तर विजय दराडे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी भीमा पाटील यांनी आभार मानले.

पुढील काळात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आंदोलन निश्चित करण्यासंदर्भात अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले. नाशिक जिल्हा किसान सभेची नूतन कार्यकारिणीही यावेळी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी नांदगावचे देविदास भोपळे, सरचिटणीसपदी विजय दराडे, कार्याध्यक्षपदी भास्कर शिंदे, उपाध्यक्षपदी नामदेव बोराडे (नाशिक), अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे (चांदवड), शांताराम पवार (नांदगाव),

सहसचिव किरण डावखर, खजिनदार निवृत्ती कसबे, जिल्हा संघटक म्हणून सुखदेव केदारे तर महिला किसान सभेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. साधना गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीत रंगनाथ जिरे, मधुकर मुठाळ, जगन माळी, प्रवीण पाटील, राहुल वाघ, प्रकाश भावसार, नामदेव केले, ठाकरे, राजू जाधव, धर्मा चव्हाण, विमल पवार, जिभाऊ वाघ यांचा समावेश करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com