मनपा सेवकांना विमा सुरक्षा कवच
नाशिक

मनपा सेवकांना विमा सुरक्षा कवच

उपचारासांठी ५ तर मृत्यू झाल्यास ५० लाख मिळणार

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून वाढत असलेल्या करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका अधिकारी व सेवक सोळा ते अठरा तास काम करीत असल्याने त्यांचे जीवाचे संरक्षण करण्यासाठी महापालिका स्थायी सभापती गणेश गिते यांनी महत्वपुर्ण निर्णय घेतला. यात करोना योध्दा म्हणुन लढतांना आजारी पडल्यानंतर उपचारासाठी ५ लाख रुपये आणि मृत्यू ओढावल्यास ५० लाख रुपयांचा विमा लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता करोना विरुध्द लढ्याला मोठे बळ मिळणार आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची व्हिडीओ कोॅन्फरसिंग सभा सभापती गिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोकतांना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सेवकांना लागण झाली आणि सुरक्षा रक्षकांना तसेच इतर विभागातील सेवकांना देखील लागण झाली. सदस्य राहुल दिवे यांनी महापालिका अधिकारी -सेवक हे करोना योध्दा म्हणुन काम करीत असल्याने त्यांना बाधा झाल्यास उपचारासाठी ५ लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचा विमा काढण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

२.५ कोटींच्या अँटीजेन किट खरेदीला मंजुरी

नाशिक शहरात २५ फिरत्या दवाखान्यातून आरोग्य तपासणी व अँटीजेन तपासणी केली जात आहे. तसेच नगरसेवकांच्या मागणीनंतर अनेक प्रभागात अँटीजेन चाचणी शिबिर घेतले जात असुन काही भागात या किटचा तुटवडा असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केली. यापार्श्वभूमीवर सभापतींनी २ कोटी २६ लाख रुपयांच्या अँटीजेन किट खरेदीला मान्यता दिली.

यावरील चर्चेत महापालिकेच्या कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांवर उपचार करतांना किटचा तुटवडा असल्यासंदर्भातील गंभीर बाबीकडे नगरसेवकांनी सभापतींचे लक्ष वेधले. याप्रस्तावावरील चर्चेनंतर सभापती गिते यांनी दिवे यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सभापतींच्या निर्णयामुळे महापालिकेच्या करोना योध्दांना मोठे बळ मिळाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com