पत्रकारास पोलीस उपअधीक्षकाची अपमानास्पद वागणूक; पत्रकार संघटनेच्या वतीने बदलीची मागणी

पत्रकारास पोलीस उपअधीक्षकाची अपमानास्पद वागणूक; पत्रकार संघटनेच्या वतीने बदलीची मागणी

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgaon Basvant

येथील टोलनाक्यावर वृत्तांकनासाठी गेलेल्या एका दैनिकाच्या पत्रकारास (journalist) उर्मट भाषा वापरून

अपमानास्पद वागणूक (Abusive behaviour) देणार्‍या नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले (Nashik Rural Deputy Superintendent of Police Arjun Bhosale) यांचा पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) पत्रकार संघटनेच्या (Journalists Association) वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

अर्जुन भोसले यांची नाशिक जिल्ह्यातून (nashik district) तातडीने बदली करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्याकडे निवेदनाद्वारे (memorandum) करण्यात आली आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे पिंपळगाव बसवंत शहरातील टोलनाक्यावर गांजा झाड असल्याबाबत एका दैनिकात वृत्त प्रसिद्ध होताच या झाडाच्या पहाणी प्रसंगी टोलनाक्यावर नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले,

टोलनाका प्रशासनाचे पीआरओ अर्जुन काळे व कर्मचारी संपत कडाळे घटनास्थळी उपस्थित असताना पोलीस अधिकार्‍यांसमोरच अर्जुन काळे यांनी संबधीत पत्रकारास मारहाण करण्याची धमकी दिली. त्यावर पोलीस प्रशासनाने (Police Administration) बघ्याची भूमिका घेतली. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी पत्रकार असतील तुमच्या घरी अशी उर्मट भाषा वापरल्याने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणार्‍या पत्रकारांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणुक (Abusive behaviour) देणं हे निंदनीय असल्याने यामुळे नाशिक ग्रामीण मधील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्यावर तातडीने कारवाई करत त्याची नाशिक जिल्ह्यातून बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात पत्रकारास मारहाण करण्याची धमकी देणार्‍या पिंपळगाव बसवंत टोलनाक्याचे पीआरओ अर्जुन काळे यांच्यासह टोलनाका कर्मचारी संपत कडाळे यांच्यावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदनप्रसंगी पत्रकार संघाचे सदस्य रावसाहेब उगले, दीपक आहिरे, गिरीश बिडवई, राजेंद्र पवार, सोमनाथ चौधरी, राकेश बनकर, गणेश शेवरे, तुषार झेंडफळे, अमोल गायकवाड आदींसह पिंपळगाव परिसरातील पत्रकार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com