नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या तहसीलदारांना सूचना

नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या तहसीलदारांना सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात तालुकानिहाय आपत्कालीन नियंत्रण कक्ष (Emergency Control Room) सुरू करावेत. पावसाळ्यात वीज कोसळून होणारी मनुष्यहानी, पशुहानी टाळण्यासाठी मौसमसारख्या हवामान खात्यांच्या मोबाइल अॅपबाबत प्रभावी जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) यांनी केल्या आहेत...

तहसीलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दि.१ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector's office) मध्यवर्ती सभागृहात मागील सप्ताहात मान्सून पूर्व आढावा बैठक (Review Meeting) झाली असून त्यावेळी वाघ यांनी या सूचना केल्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी भीमराज आपत्ती दराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते. तसेच जिल्ह्यातील तहसीलदार,एसआरडीएफ, एनडीआरएफचे माध्यमातून बैठकीला हजेरी लावली.

महापालिका, जलसंपदा व जिल्हा व्यवस्थापनाकडून पावसाळ्यापूर्वी (Before Monsoon) सुरू असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात येत्या १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.

तसेच चेंबरची दुरुस्ती, स्वच्छता, नालेसफाई, पावसाळी गटारींची स्वच्छता आदी कामे महापालिकेने तातडीने आटोपून घ्यावी, सार्वजनिक बांधकाम विभागानेही ग्रामिण भागात देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करावी, महावितरणकडून वीजपुरवठ्या संबंधित आवश्यक ती सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

तर मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे अधिकारी यांनी ऑनलाइन दृकश्राव्य वेळेत पूर्ण करावी, असे आदेशही देण्यात आले. यावेळी नाशिक शहराजवळील नदीकाठालगत असलेल्या पर्यटनस्थळांवर महापालिकेने मोठ्या संख्येने ठळक अक्षरात सूचनाफलक उभारावेत. तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरसुद्धा सूचनाफलक उभारावेत.धोकादायक पूल, फरशी पूल, पुलाचे संरक्षक कठड्यांची डागडुजीची कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com