पुनदच्या कामास गती देण्याचे निर्देश

पुनदच्या कामास गती देण्याचे निर्देश

सटाणा । प्रतिनिधी Satana

पुनद पाणीपुरवठा योजनेच्या ( Punad water supply scheme ) संथगतीने सुरू असलेल्या कामास गती देण्याची सूचना जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे ( District Administration Officer Nitin Mundavare )यांनी योजनेच्या कामाची पाहणी केल्यानंतर केली.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( Collector Suraj Mandhare )यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेतील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

यावेळी मुंडावरे यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारक, पाठक मैदान परिसरातील नाना-नानी पार्क, रिंगरोड, चौगाव बर्डी येथील दोन जलकुंभांचे बांधकाम, कचरा डेपो व नव्याने विकसित होत असलेल्या मोकळ्या भूखंडांची पाहणी केली. पुनद पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत शहरातील जल वितरण वाहिनीच्या कामकाजाची पाहणी केली.

आढावा बैठकीत मुंडावरे यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जल, अग्नी, वायू या घटकांमध्ये नगरपरिषदेचे काम उंचावण्याचे निर्देश देत शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व रेन वॉटर परकुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली.

आरोग्य सुविधा व नगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या कामकाजाचीदेखील पाहणी केली. दरम्यान, मुंडावरे यांनी पुनद पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संथगतीने सुरू असलेल्या योजनेच्या कामास गती देण्याची सूचना केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com