इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसाठी निर्देश

इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसाठी निर्देश

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (Delhi-Mumbai Industrial Corridor )होण्यासाठी गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू असलेल्या खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. या प्रकल्पाचे तातडीने सर्वेक्षण करावे, असे निर्देश आज राज्य शासनाने नॅशनल इंडस्ट्रिअल मुंबई इंडस्ट्रिअल डेव्हलमेंट कार्पोरेशन प्रशासनाला दिले आहे.

या निर्देशामुळे आता प्रस्तावित दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

प्रस्तावित दिल्ली कॉरिडॉरसाठी नाशिक येथे पाण्याची उपलब्धता नसल्याने पहिल्या टप्प्यातुन नाशिकला वगळण्यात आले होते. आजमितीस औरंगाबाद येथील दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

औरंगाबादला पाणी नाशिकहून जाते. खा. गोडसे यांनी अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक या नदी जोड प्रकल्पातुन दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पासाठी पाणी जलसंपदा विभागाकडून आरक्षित करून घेतलेले आहे. या प्रकल्पाची सिन्नर आणि इगतपुरी या तालुक्यातील हजारो एकर जागा उपलब्ध होवू शकते हे गोडसे यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले होते.

या प्रकल्पासाठीचा भूसंपादनाचे काम राज्य शासनामार्फत होणार असून पायाभूत सुविधा केंद्र सरकार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com