गृहरक्षक दलाच्या जवांनांसाठी विशेष धोरण

गृहखात्याचे निर्देश
गृहरक्षक दलाच्या जवांनांसाठी विशेष धोरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात कार्यरत होमगार्डना Homeguards नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण Special policy तयार करण्याच्या सूचना आणि होमगार्डना विमा योजनेचा लाभ देण्यासंंदर्भात विमा कंपन्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याचे निर्देश गृहखात्याने दिल्याने गृहरक्षक दल जवांनांना पुन्हा अच्छे दिन येण्याचा मार्ग मोकळा झालाआहे.

पोलीस ठाण्यांतर्गत बंदोेबस्तासह वाहतूक नियंत्रण, गुप्तवार्ता संकलन, पेट्रोलिंग, बिनतारी संदेशवहन अशा विविध स्वरूपातील कामे हे जवान करतात. कर्तव्यापोटी पुर्वी दीडशे रुपये तर उपाहार, कवायत, भोजन व खिसाभत्ता म्हणून अनुक्रमे 25, 45, 65 रुपये प्रतिदिन मिळत होतेे. आता त्यात वाढ झाली असली तरी महागाई व इतर कर्मचार्यांच्या तुलनेत मोबदला नगण्य असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती.

पोलिस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. या होमगार्डच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Home Minister Dilip Walse Patil यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महान्यात आढावा बैठक झाली होती. त्यानंतर होमगार्डला दिलासा देणारे निर्णय अमलाता येऊ लागले आहेत.

होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. एका आठवड्याच्या आत कर्तव्य भत्ता अदा करणे, मानसेवी अधिकार्यांची नियुक्ती असे बरेच प्रश्न आता निकाली निघत आहेत.

राज्यासाठी केंद्र शासनाने 53 हजार होमगार्डची संख्या निश्चित केलेली आहे. सद्यस्थितीत रिक्त असलेल्या होमगार्डच्या पदांच्या भरतीसंदर्भात कार्यवाही करण्याचीही कार्यवाही आता होणार आहे. विशेष म्हणजे अपात्र 1704 होमगार्डना पुन्हा संघटनेमध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्यांना नियुक्ती देण्याची तसेच नियमित सुरु होणार आहेे.

वयाची 50 ते 55 वर्षे पूर्ण झालेल्या होमगार्डची शारीरिक पात्रता तपासण्याच्या अटी शिथील झाल्याने व दोन लस घेणाऱ्या जेष्ठ जवानांना पुन्हा सामावुन घेतल्यानेे त्यांना कामाची संधी मिळाली आहे. आता या होमगार्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागासाठी आवश्यक असणारे वाहनचालक,चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तयार केला जात आहे.वर्षात180 दिवस कायम स्वरुपी काम मिळाल्यास होमगाड कडे तरुणांना ओढा वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com