आता मिळणार झटपट बांधकाम परवानगी

आता मिळणार झटपट  बांधकाम परवानगी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेला ( NMC )सुमारे 450 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असलेल्या नगररचना विभागाला (Town Planning Department) झटपट ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यासाठी दोन सॉफ्टवेअर कार्यान्वित होणार आहे.

महाआयटीच्या बीपीएमएस संगणक प्रणालीला पर्याय म्हणून सॉफ्ट टेक कंपनीच्या ‘ऑटो डिसीआर’ (Auto DCR)या संगणकीय प्रणालीला शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील नवीन प्रकल्पांचा वेग वाढणार आहे.

नाशिक महापालिकेच्या मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे नगररचना विभाग आहे. या विभागाला आणखी सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून नवीन सॉफ्टवेअर संगणक प्रणाली आणली जात आहे.

यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल तसेच विकास कामांसाठी त्या पैशांचा चांगला उपयोग होणार आहे. सध्या नगरच्या विभागात सेवकांची कमी असली तरी मोठ्या प्रमाणात काम होत आहे. त्यात सॉफ्टवेअर प्रणालीची भर पडल्यास आणखी जलद गतीने काम होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com