नाशिक । प्रतिनिधी Nashik

ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्नित असलेल्या जेसीआय ग्रेपसिटीचा 26 वा तर जेसीआय ग्रेपसिटी क्वीन्सचा सहावा पदग्रहण समारंभ नुकताच गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पार पडला.

जेसीआय ग्रेपसिटीच्या अध्यक्षपदी मितेश छाजेड तर जेसीआय ग्रेपसिटी क्वीन्सच्या अध्यक्ष पदासाठी विणा प्रवीण चांडक यांचा शपथविधी झाला. सुनील रोकडे व सुवर्णा रोकडे यांची सचिवपदी तर योगेश बाफना व श्रुती बोरा यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या 2021 च्या पूर्ण कार्यकारिणीचाही शपथविधी पार पडला.

तत्पूर्वी ग्रेपसिटीचे मावळते अध्यक्ष पराग घारपुरे व ग्रेपसिटी क्वीन्सच्या अध्यक्षा शीतल जोशी यांनी वर्ष 2020 च्या आपल्या कार्याचा अहवाल सभेपुढे मांडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय नाशिकरोड मल्टीपर्पज असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप मेढे तर सन्मानित अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी पारख हे उपस्थित होते. पदग्रहण अधिकारी म्हणून झोन 13 चे झेडव्हिपी रिषभ शहा यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पंकज जैन, अजय चव्हाण, जितेंद्र बोरा, राजेश चंडालीया, प्रशांत पारख, वैशाली पारख, सुप्रिया जैन, विनया तिसगांवकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महेश दीक्षित, प्रसन्न शिरापुरे, केतन ओस्तवाल, प्रदीप गिरासे, जयेश येवले, सचिन जाधव, नेहा तिसगांवकर, गायत्री शिरापुरे, प्रसन्ना वारके, सारीका वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले.