कुपोषणमुक्तीत रामकृष्ण संस्थानचे कार्य प्रेरणादायी: डॉ. पवार

कुपोषणमुक्तीत रामकृष्ण संस्थानचे कार्य प्रेरणादायी: डॉ. पवार

घोटी | वार्ताहर | Ghoti

कुपोषणमुक्त भारत (Malnutrition free India) करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने (Sri Ramakrishna Institute of Health) सुरु केलेला उपक्रम उपयुक्त असून यामुळे अनेक महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

सर्वांच्या सहभागाने कुपोषण मुक्त भारत होण्यासाठी आशा सेवक, नर्सेस, अंगणवाडीसेविका, डॉक्टर आणि कोरोना योद्धांनी संकटकाळात केलेले काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रिय आरोग्य ,कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांंनी केले.

विवेकानंद इन्स्टिट्यूट (Vivekananda Institute) मार्फत गर्भवती महिला व कुपोषित बालकांसाठी राज्यात मल्टी व्हिटॅमिन गोळ्या (Multi-vitamin tablets) दिल्या जाणार आहे, या प्रकल्पाचा शुभारंभ इगतपुरी तालुक्यातून (igatpuri taluka) करण्यात आला. यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. डॉ.पवारांच्या हस्ते विविध मातांना व्हिटॅमिन आणि इतर पूरक औषधे वाटप करण्यात आली.

श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचालित विवेकानंद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष स्वामी कंठानंद आपल्या प्रभावी भाषणात म्हणाले की, आमच्यामार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संन्यासी व्यक्तीने जागरूकतेने देश पुढे नेण्यासाठी कटीबद्ध व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यावळी संस्थानचे सरचिटणीस स्वामी विश्वरूपानंद (General Secretary Swami Vishwaroopananda) व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हा नेते पांडुरंग बर्‍हे, अण्णा डोंगरे, संघटनमंत्री सुनील बच्छाव, नगरसेविका साबेरा पवार, कैलास कस्तुरे, अण्णा पवार, शरद कासार, किरण फलटणकर, सीमा झोले, जगन भगत, भाजयुमोचे रवी गव्हाणे, योगेश चांदवडकर, मयूर परदेशी, महेश शहाणे, चेतन जोशी, रोहन दगडे, आदित्य निखळे, सागर हांडोरे,

वैशाली आडके, तानाजी जाधव, रमेश निसरड, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकाऱी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, सहाय्य्क बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. विश्वनाथ खतेले, आरोग्य संस्थानचे संदीप कुयटे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com