जिल्ह्यातील वाईनशॉपची तपासणी, १४ दुकाने सील

जिल्हा संयुक्त समितीकडून कारवाई
जिल्ह्यातील वाईनशॉपची तपासणी, १४ दुकाने सील

नाशिक | Nashik

ग्रामिण पोलीसांनी केलेल्या अवैध मद्य वाहुक कारवाई प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीने धडक कारवाई सुरू केली असून समितीच्या सुचनेवरून राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त आदेश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हाभरातील संशयित वाईन शॉपची तपासणी मुंबई येथील राज्य उत्पादनल शुल्क विभागाने सुरू केली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या शहरातील १४ वाईनशॉप सील करण्यात आल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन होणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार धडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार चार दिवसांपुर्वी जिल्ह्यातील मालेगाव हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर पशुखाद्याच्या आडून ट्रकमधून लाखो रूपयांचा अवैध मद्यासाठ्याची वाहतुक केली जात होती.

रात्रौ ११ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस कर्मचारी भोये व खैरनार यानी टेहरे फाटा परिसरात एका ट्रकवर छापा टाकला. सदर ट्रकमध्ये पशुखाद्याच्या गोण्यांचे आड लपवून ठेवलेला ३८ लाख ६६३ रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला होता.

याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा सखोल तपास केला असता यामध्ये जिल्ह्यातील एका मोठ्या मद्यविक्रेत्या मालकाचे नाव समोर आले होते.

दोन दिवसांपुर्वी राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप याची आढावा बैठक होती. यामध्ये या विषावर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर उमाप यांनी मुंबईच्या राज्य उत्पादन विभागाच्या पथकास संशयित वाईन शॉप तपासणीचे आदेश दिले होते.

त्यानुसार ही तपासणी करण्यात आली असून दोषी आढळलेल्या नाशिक शहरातील एकाच मालकाच्या १४ वाईन शॉप सील करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना या कारवाईचा अहवाल तातडीने सादर करण्यास राज्य उत्पादन विभागास सांगण्यात आले असल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com