समृध्दी महामार्गाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

समृध्दी महामार्गाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे (Mumbai-Nagpur Samrudhi Highway) काम अंतिम टप्यात आले असून जिल्हाधिकारी गंगाधरण डी. (Collector Gangadharan D.) यांनी तालुक्यातून जाणार्‍या महामार्गाच्या कामाला भेट देत आढावा घेतला.

पॅकेज नंबर 12 मधील महामार्गाचे कामकाज (Highway work) अंतिम टप्प्यावर येऊन ठेपले आहे. येणार्‍या काही महिन्यातच हा महामार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. मात्र, अंतिम टप्यात असतानाही कामकाजात अनेक अडचणी येत आहेत.

महामार्गालगतच्या शेतकर्‍यांच्या (farmers) समस्याही वाढत असून जिल्हाधिकार्‍यांनी महामार्गालगत असणार्‍या शेतकर्‍यांच्याही भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण (Solving problems) करण्याचे आदेश देखील घटनास्थळी दिलेत.

यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे (Deputy Collector Vitthal Sonawane), महेश शिंदे, प्रांतधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सागर कोते, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष मिश्रा, वरिष्ठ लायझन मॅनेजर सुनील सिंह तोमर, रोशनलाल तिवारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com