रस्ता दुरुस्ती कामाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

रस्ता दुरुस्ती कामाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील रस्त्यावर पडलेले खड्डे, त्याच्या होत असलेल्या दुरुस्तीकामाची पाहणी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी करून समाधान व्यक्त करत मार्गदर्शक सूचना केल्या. आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करंजकर प्रथमच कामाच्या पाहणीसाठी नाशिकरोडला आले.

शहरात पाऊस कमी झाला. त्या तुलनेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेक भागात लहान-मोठे अपघात घडत होते. दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील वीर सावरकर उड्डाणपुलावर खड्डा वाचवताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनेक पक्षांनी मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली, निवेदन दिले.

या पार्श्वभूमीवर मनपा बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी यांनी तत्काळ रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले. हे काम शहरात सुरू असताना मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अचानक उपनगर सिग्नल ते जेलरोड पाण्याची टाकी असलेल्या कॅनालरोड, वीर सावरकर उड्डाणपूल, बिटको ते देवळाली कॅम्पकडे जाणार्‍या लॅमरोड येथे सुरू असलेल्या कामांना भेटी दिल्या. सदरची कामे दर्जेदार पद्धतीने करून वाहनचालकांना त्रास होणार नाही, अशा अनेक सूचना डॉ. करंजकर यांनी दिल्या. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपअभियंता नीलेश साळी, शाखा अभियंता मोहम्मद डोंगरे आदी उपस्थिती होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर डॉ. अशोक करंजकर यांनी प्रथमच नाशिकरोडमध्ये होणार्‍या कामांना भेटी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com