आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी

आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी

नाशिक | प्रतिनिधी

शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी केली.

ज्या सोसायटीत किंवा घरात ५ पेक्षा अधिक बाधित आढळून येत आहेत ते घर किंवा सोसायटी कन्टेंन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात आहे. त्यानुसार शहरात २१ प्रतिबंधित क्षेत्र असून तेथे २१९ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

यापैकी पाच ठिकाणी १३ हून अधिक बाधितांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे तेथील नियोजन पाहण्यासाठी आयुक्तांनी संयुक्त पाहणी दौरा केला. यावेळी तेथे तैनात केलेल्या पोलिसांसह मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील बॅरीकेडींग, क्युआर कोड याचाही पाठपुरावा त्यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com