प्रतिबंधीत क्षेत्र व करोना केअर सेंटरची पाहणी
नाशिक

प्रतिबंधीत क्षेत्र व करोना केअर सेंटरची पाहणी

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पिंपळगावला भेट

Abhay Puntambekar

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Basvant

येथील कंटेन्मेंट झोन व करोना सेंटरला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अचानक भेट देऊन शहराची पाहणी केली. बनसोड यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत शहरातील गर्दीवर नियंत्रण नसल्याने नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत असल्याने शहरातील रुग्णसंख्या शतकावर पोहोचली असून प्रशासन अद्यापही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावत यापुढे कडक उपाययोजना करण्याच्या

सूचना केल्या.

येथे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अचानक भेट दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. यावेळी बनसोड यांनी येथील करोनामुक्त झालेल्या पाच नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी या रुग्णांना रुग्णालयात मिळणार्‍या सेवेची व तक्रारीची माहिती जाणून घेतली व येथे काही कमी पडते का? जेवण वेळेवर मिळते का? अशी विचारणा करत पं. स.चे गटविकास अधिकारी संदीप कराड, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन मोरे यांना करोना सेंटरमध्ये आलेला रुग्ण हा घरी जाताना आनंदी गेला पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, मंडल अधिकारी नीलकंठ उगले, आरोग्य अधिकारी डॉ. धनवटे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल सपकाळ आदींसह निफाड पं.स.चे विविध विभागांचे खातेप्रमुख, वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com