परराज्यातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी

परराज्यातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर Nashikroad Railway Station दररोज परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना नाशिक महानगरपालिकेकडून NMC तपासणी होत असून रेल्वे प्रवाशांची रॅपिड अँटीजेन टेस्ट Rapid antigen test केली जात आहे.

गीतांजली एक्सप्रेस, एरणाकुलम, पाटलीपुत्र, लखनऊ, काशी, बनारस, हावडा, राजधानी या महत्त्वाच्या गाड्यांतील प्रवाशांची सध्या तपासणी केली जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव नाशिक शहरात व जिल्ह्यात होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिका व बिटको हॉस्पिटलची वैद्यकीय टीम परिश्रम घेत आहे.

महिन्याला सुमारे पावणेदोनशे बाधित रूग्ण रेल्वे स्थानकावर सापडत आहे. रेल्वे प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेने यंत्रणा विकसित केली आहे. नाशिकरोड येथे आकाश गडगडे, समाधान ठाकूर, हसीब पिरजादे, रोशन दिवे हे महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक अथक प्रयत्न घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com