कादवा इथेनॉल प्रकल्पाची साखर आयुक्तांकडून पाहणी

कादवा इथेनॉल प्रकल्पाची साखर आयुक्तांकडून पाहणी

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

साखर निर्मिती कमी करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी इथेनॉल ( ethanol ) सोबतच विविध बायो प्रोडक्ट निर्मिती होणे गरजेचे आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड ( State Sugar Commissioner Shekhar Gaikwad ) यांंनी प्रतिपादन केले.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास ( Kadva co-operative sugar factory ) भेट देत इथेनॉल प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी चेअरमन श्रीराम शेटे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, विक्रीकर आयुक्त सुमेरसिंह काळे, लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांचे स्वागत करत कारखान्याची वाटचाल विशद केली.

राज्यातील साखर उद्योग अत्यंत प्रतिकूल परिस्थितून वाटचाल करत असताना काही वर्षांपूर्वी मोठ्या अडचणीत सापडलेला कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे यांचे नेतृत्वाखाली योग्य नियोजनाने अत्यंत सुस्थितीत चालू असून सहकारपुढील हा एक चांगला आदर्श आहे’, असे गायकवाड म्हणाले.

यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश कळमकर, विलास पाटील, तज्ञ संचालक संपत कोंड यांनी कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवीचा धनादेश आयुक्त गायकवाड यांचे हस्ते सुपूर्द केला.

यावेळी व्हा. चेअरमन उत्तम भालेराव, संचालक मधुकर गटकळ, त्र्यंबकराव संधान, शहाजी सोमवंशी, बाळासाहेब जाधव, दिनकरराव जाधव, बापूराव पडोळ, विश्वनाथ देशमुख, कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, शिवाजी बस्ते, सुनील केदार, रामदास पाटील, नामदेव घडवजे, रघुनाथ जाधव,

कार्यकारी संचालक हेमंत माने प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, जे. एल. शिंदे, मुख्य अभियंता विजय खालकर, चीफ केमिस्ट सतीश भामरे, डीस्टीलरी प्रमुख सुदाम पवार, स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके, सचिव राहुल उगले, लेखापाल सत्यजित गटकळ, शेतकी विभागाचे लीलाधर घडवजे उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले. यावेळी गायकवाड यांच्या हस्ते इथेनॉल प्रकल्प आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com