Nashik News : मनपा आयुक्त व अधिकार्‍यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

Nashik News : मनपा आयुक्त व अधिकार्‍यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव (Public Ganeshotsav) विसर्जन मिरवणूक (Immersion Procession) मार्गाची पाहणी गुरुवार (दि.२१) रोजी नाशिक महानगरपालिकेचे (Nashik Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी केली.

यावेळी विसर्जन मिरवणूकीचा मार्ग, वाकडी बारव, फाळके रोड, दूध बाजार, गाडगेमहाराज पुतळा परिसर, मेन रोड, धुमाळ पॉईंट,एमजी रोड,मेहेर सिग्नल,अशोक स्तंभ,रविवार कारंजा,मालेगांव स्टँड,पंचवटी कारंजा,मालवीय चौक, रामकुंड परिसर,गौरी पटांगण,म्हसोबा पटांगण या मार्गाची पाहणी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर (Commissioner Dr. Ashok Karanjkar) यांनी केली.

या मार्गावर असलेले अतिक्रमण (Encroachment) त्याचबरोबर या मार्गावरील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. नाशिक महानगरपालिकेचे दिशा दर्शक फलकावर असलेले राजकीय व्यक्तीद्वारे लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. रामकुंडावर गणेशमूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच जास्तीत जास्त गणेश मूर्ती संकलन केंद्रावर दान देण्याचे आवाहन नाशिककर आणि विविध स्वयंसेवी संस्थांना यावेळी आयुक्तांनी केले.

दरम्यान, या पाहणी दौर्‍यात नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांच्यासह कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे , घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.कल्पना कुटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पंचवटी विभागीय योगेश रकटे, विद्युत विभागाचे उपअभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता नितीन भामरे, कनिष्ठअभियंता सुभाष बहिरम, स्वीय सहाय्यक दिलीप काटे, पंचवटी उपअभियंता रवींद्र घोडके, प्रकाश निकम, सोमनाथ घोलप, अरुण मोरे, रामदास शिंदे, विक्रम गोंगे यांच्यासह आदी अधिकारी सहभागी होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com