ई-सेवा केंद्रांची झाडाझडती

नियमबाह्य कामांबाबत चौकशी
ई-सेवा केंद्रांची झाडाझडती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महा ई सेवा केंद्रावर ( Maha E -Seva Center )नागरिकांची लूट होण्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर नाशिक तहसीलदार आणि त्यांच्या टीमने एकाच वेळी शहरासह सर्व तालुक्यातील ई सेवा केंद्रांची तपासणी (Inspection of E-Seva centers ) करत झाडाझडती घेतली. प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लघन करणार्‍या केंद्रांचा अहवाल तयार करत जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत या केंद्रांबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सांगितले.

दरम्यान, पुढील महिन्यापासून शाळा -महाविद्यालयांचे प्रवेश सुरु होणार आहे. शाळा, महाविद्यालयात शासकीय कागदपत्रे अनिवार्य करण्यात आले असून प्रशासनाने यापूर्वीचे सेतू केंद्र बंद करत त्या जागी ई सेवा आणि आपलं सरकार या केंद्रांची स्थापना केली आहे. ही केंद्रे जादा दर आकारण्यासोबतच अनेक नियमबाह्य काम करत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी प्रामुख्याने याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

लागलीच अधिकार्‍यांनी याबाबत नियोजन करत शहरासह तालुक्यातील 350 केंद्रांची एकाच दिवसी तपासणी करून त्या परिस्थितीत केंद्रांची झाडाझडती घेत तेथील सत्य परिस्थिती जाणून घेतली आहे. त्यात जे आढळून आले त्याबाबतच अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

14 पथके कार्यरत

संपूर्ण जिल्हाभरात या केंद्राचे जाळे आहे. केंद्र चालक सावध होऊ नये यासाठी नियोजन करत तहसीलदार अनिल दौंडे यांनी 14 पथके कार्यरत केले आणि एकाच वेळी सर्व ठिकाणी चौकशी केली. या 350 केंद्रांच्या तपासणीसाठी नायब तहसीलदार, अव्वल कारकून ,कारकून यांच्या अध्यक्षतेखाली 14 पथकांची स्थापना करत त्यांना तपासणीसाठी केंद्र वाटून दिली. त्यानुसार या पथकांनी केंद्राची दिवसभरात तपासणी केली.

Related Stories

No stories found.