
येवला | प्रतिनिधी | Yeola
येथील शहर व तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र कहर केला आहे. त्यामुळे तालूक्यातील कातरणी आडगाव, रेपाळ, पाटोदा, विखरणी, आधी भागात पावसाची २४ तासाहून अधिक काळापेक्षा संततधार सुरू असल्याने नदी नाले ओसांडून वाहत आहे.
कालच्या या पावसामुळे येवला तालुक्यातील अनेक ठिकाणची शेती खचून गेली असून कांद्याच्या (Onion) रोपाचे, मका (Maize) पिकाचे नुकसान (Damage) झाले आहे. तसेच यासंदर्भात आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांनी तातडीने दखल घेऊन तहसीलदार प्रमोद हिले (Tehsildar Pramod Hille) यांना नुकसानग्रस्त भागात पाहणी करून माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तहसीलदार हिले, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पाटोद्याचे मंडळ अधिकारी चंदावार, कातरणीचे तलाठी विजय भदाणे, कृषी मंडळ अधिकारी जे आर क्षीरसागर, कोतवाल बापू पवार यांच्यासह आदींनी पाहणी केली. यानंतर ज्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे (Panchnama) करून शासनाकडे अहवाल पाठवून लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही तहसीलदार हिले यांनी दिली.